Health Care esaka;
लाइफस्टाइल

Health Care : आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी प्रत्येक महिलेने आहारात ‘या’ सुपरफूड्सचा करावा समावेश

निरोगी आरोग्यासाठी तुम्ही सुंतलित आहार घेणे आणि नियमितपणे व्यायाम करणे, अतिशय गरजेचे आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलांना अनेक शारिरीक समस्यांचा सामना करावा लागतो.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : निरोगी आरोग्यासाठी तुम्ही सुंतलित आहार घेणे आणि नियमितपणे व्यायाम करणे, अतिशय गरजेचे आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलांना अनेक शारिरीक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक प्रकारच्या शारिरीक बदलांमधून त्यांना जावे लागते.

कधीकधी मासिक पाळीतील हार्मोनल चढ-उतार तर कधी गर्भधारणा प्रसूती, त्यानंतर स्तनपान आणि नंतर रजोनिवृत्ती. या टप्प्यांमधून जाताना महिलांच्या शरीरावर अनेक प्रकारचे परिणाम होण्याची शक्यता असते.

या परिस्थितीमध्ये, थकवा, अशक्तपणा, शरीरात लोहाची कमतरता, सुस्ती येणे, हाडे दुखणे आणि मासिक पाळीतील असह्य वेदनांचा सामना महिलांना करावा लागतो. त्यामुळे, महिलांनी त्यांच्या आरोग्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खाण्याच्या सवयींकडे लक्ष देणे.

आयुर्वेदानुसार अनेक महत्वाचे असे सुपरफूड्स आहेत, जे महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. या सुपरफूड्सचे सेवन केल्याने महिलांना या शारिरीक समस्यांना सामोरे जाण्याचे बळ मिळते आणि शरीराला आवश्यक ऊर्जा प्राप्त होते.  कोणते आहेत हे सुपरफूड्स? चला तर मग जाणून घेऊयात.

खजूर

खजूरमध्ये अनेक प्रकारच्या पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे आढळून येतात. त्यामुळे, खजूर आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहेत. खजूरचे सेवन केल्याने शरीराला ताकद मिळते आणि अशक्तपणा निघून जाण्यास मदत होते.

नैसर्गिक साखरेचा उत्तम स्त्रोत म्हणून ही खजूरला ओळखले जाते. या सुपरफूडचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील थकवा, अशक्तपणा, लोहाची कमतरता, अनियमित मासिक पाळी इत्यादी समस्यांवर प्रभावीपणे काम करते. महिलांनी त्यांच्या आहारात या सुपरफूडचा अवश्य समावेश करायला हवा.

आवळा

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळा अतिशय फायदेशीर आहे. आयुर्वेदामध्ये आवळ्याचे अनन्यसाधारण असे महत्व सांगण्यात आले आहे. लहान असो किंवा प्रौढ सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी आवळा अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे, महिलांसोबतच इतर सर्व वयोगटातील व्यक्तींनी त्यांच्या आहारात आवळ्याचा जरूर समावेश करावा.

कच्चा आवळा, आवळ्याचा ज्यूस, आवळ्याची कॅंडी, इत्यादी प्रकारे आवळ्याचे सेवन करू शकता. व्हिटॅमीन सी ने समृद्ध असलेला हा आवळा महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

तीळ

फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि लोह इत्यादींसारख्या अनेक शक्तिशाली पोषक तत्वांचा समृद्ध आणि उत्कृष्ट स्त्रोत म्हणजे तीळ होय. तीळाचे नियमित सेवन केल्याने स्नायू आणि हाडांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. आपल्या शरीराच्या मज्जासंस्थेसाठी देखील तीळ अतिशय लाभदायी आहे. महिलांनी या सुपरफूडचा त्यांच्या आहारात जरूर समावेश करायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT