Hair Care News : esakal
लाइफस्टाइल

Hair Care News : हेअर ट्रिमिंग केल्याने केसांना मिळणारे फायदे माहित आहेत का?

केसांचे नियमितपणे ट्रिमिंग केल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care News : केसांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. ज्यामध्ये हेअर स्पा, हेअर मास्क, हेअर ब्लो ड्राय आणि केसांना नियमित शॅंम्पू आणि कंडिशनिंग अशा अनेक गोष्टी करतो.

परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की, नियमितपणे केस ट्रिम करणे किंवा केस कट करणे हे देखील केसांसाठी फायदेशीर आहे. केस नियमितपणे ट्रिम केल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

आज आपण केसांचे ट्रिमिंग केल्याने केसांना होणारे फायदे कोणते? त्याविषयी जाणून घेणार आहोत.

केसांना ट्रिमिंग करण्याचे फायदे खालीलप्रमाणे :

केस तुटण्याचे प्रमाण कमी होते

केसांना फाटे फुटले की केस खराब होण्याचे प्रमाण वाढते. केसांना फाटे फुटल्यामुळे केसांचा अधिक गुंता होण्यास सुरूवात होते. केस ट्रिम केल्याने केस चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते. केसांना फाटे फुटल्याने केस तुटण्याची समस्या देखील निर्माण होते. त्यामुळे, केस ट्रिम करणे फायद्याचे ठरते. केस ट्रिम केल्याने केस तुटण्याचे प्रमाण काही अंशी कमी होते.

केसांचे आरोग्य सुधारते

केस नियमितपणे ट्रिम केल्याने किंवा केस कापल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते. केसांना फुटलेले फाटे आणि खराब केसांची समस्या दूर करण्यासाठी केस अवश्य ट्रिम करावेत किंवा कापावेत. केस ट्रिम केल्याने केसांना छान लूक देखील मिळतो आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

केसांचा पोत सुधारते

केस नियमितपणे ट्रिम केल्याने किंवा केस कट केल्याने केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. केस नियमितपणे ट्रिम केल्याने केस घनदाट आणि चमकदार दिसण्यास मदत होते आणि केसांना वेगळाच लूक मिळतो.

स्टाईल केलेल्या केसांची देखभाल करणे सोपे जाते

जर तुम्हाला तुमच्या केसांची स्टाईल बदलायला आवडत असेल तर तुम्ही केसांचे ट्रिमिंग किंवा केस कापायला हवेत. यामुळे, केसांची स्टाईल ही होते आणि केसांची चांगल्या प्रकारे देखभाल करणे देखील सोपे जाते.

केसांची वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल केल्याने तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होतो. शिवाय, केस ट्रिम केल्याने तुम्हाला एक सुंदर लूक मिळण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT