Baby Care Tips esakal
लाइफस्टाइल

Baby Care Tips : हिवाळ्यात बाळाची मालिश करण्यासाठी 'या' तेलांचा करा वापर, बाळ राहील तंदूरूस्त

हिवाळ्यात खास करून लहान मुलांची आणि वयोवृद्धांची काळजी घ्यावी लागते.

Monika Lonkar –Kumbhar

Baby Care Tips : हिवाळ्यात आपण आपल्या आरोग्याची खास काळजी घेतो. या दिवसांमध्ये खास करून लहान मुलांची आणि वयोवृद्धांची काळजी घ्यावी लागते. कारण, थंडीमध्ये त्यांच्या आरोग्याची खास काळजी घेतली तर त्यांचे शरीर आणि त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहते.

लहान बाळाची खास करून तेलाने मालिश केली जाते. तेलाने मालिश केल्याने बाळाचे शरीर सुडौल आणि मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे, बाळाची तेलाने आवर्जून मालिश केली जाते.

भारतामध्ये बाळाची मालिश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लोशन्स आणि तेलाचा वापर केला जातो. मात्र, थंडीच्या दिवसांमध्ये बाळाची मालिश करण्यासाठी तुम्ही खास तेलाचा वापर करणे महत्वाचे आहे.

जेणेकरून बाळाचे शरीर मजबूत आणि गरम राहायला हवे. हिवाळ्यात बाळाची मालिश करण्यासाठी कोणत्या तेलांचा वापर करायला हवा? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

तीळाचे तेल

तीळाच्या तेलामध्ये संतुलित फायबर्सचा समावेश आढळून येतो. यासोबतच अनेक प्रकारच्या पोषकघटकांचा समावेश या तेलामध्ये आढळून येतो. त्यामुळे, या तेलाने हिवाळ्यात बाळाची मालिश केल्याने बाळाची हाडे मजबूत होण्यास मदत होते.

शिवाय, बाळाचे शरीर आतून गरम राहते. यासोबतच, या तेलाने बाळाची मालिश केल्याने बाळाच्या मांसपेशींमध्ये होणाऱ्या वेदना देखील थांबतात.

खोबरेल तेल

हिवाळ्यात खरं तर खोबरेल तेल गोठते. त्यामुळे, अनेक जण हिवाळ्यात या तेलाचा वापर करणे शक्यतो टाळतात. मात्र, या तेलामध्ये अनेक औषधी घटकांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, हे तेल बाळाच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.

हे खोबरेल तेल तुम्ही कोमट करून या तेलाने बाळाची मालिश करू शकता. या तेलाने मालिश केल्याने शरीरातील रक्तप्रवाह प्रभावित होण्यास मदत होते, आणि बाळाची त्वचा देखील चांगली राहते. त्यामुळे, या तेलाचा वापर बाळाची मालिश करण्यासाठी अवश्य करा.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्हचे तेल बाळाची मालिश करण्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. कारण, या तेलामध्ये विविध प्रकारचे फायबर्स आणि व्हिटॅमिन्सचा समावेश आढळून येतो.

ऑलिव्ह तेलाने बाळाची मालिश केल्याने बाळाला छान रिलॅक्स वाटते. यामुळे, त्याला शांत झोप देखील लागते. या तेलाने मालिश केल्याने बाळाची त्वचा देखील हेल्दी राहण्यास मदत होते. त्यामुळे, हिवाळ्यात या तेलाने बाळाची मालिश करणे फायद्याचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT