Aqua Yoga Benefits esakal
लाइफस्टाइल

Aqua Yoga Benefits : वजन कमी करण्यासाठी लाभदायी आहे अ‍ॅक्वा योगा, जाणून घ्या फायदे

नियमित योगासनांचा सराव केल्याने आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

Monika Lonkar –Kumbhar

Aqua Yoga Benefits : निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि योगा आवश्यक आहे. योगामुळे शरीर लवचिक होण्यास मदत होते. योगामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच, वजन कमी करण्यासाठी योगा फायदेशीर आहे. फक्त यासाठी तुम्ही योगा नियमित करणे गरजेचे आहे.

अ‍ॅक्वा योगा अर्थात पाण्यात केला जाणारा योगा हा एक महत्वाचा प्रकार आहे. फक्त हा योगा प्रकार पाण्यात केला जातो. अ‍ॅक्वा योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

तसेच, तणाव दूर करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अ‍ॅक्वा योगा फायदेशीर आहे. आज आपण अ‍ॅक्वा योगा केल्यामुळे शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

अ‍ॅक्वा योगा केल्याने शरीराला होणारे फायदे खालीलप्रमाणे :

शरीराची लवचिकता वाढते

अ‍ॅक्वा योगा हा पाण्यात केला जातो. योगासनाचे अनेक प्रकार या अ‍ॅक्वा योगामध्ये ही केले जातात. अ‍ॅक्वा योगा केल्याने शरीराची लवचिकता वाढण्यास मदत होते. मांसपेशी आणि सांध्यांमध्ये मजबूती येण्यास मदत होते. त्यामुळे,शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी अ‍ॅक्वा योगा अवश्य करा.

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

योगा केल्याने वजन कमी केले जाऊ शकते. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. फक्त हा योगा नियमितपणे करावा लागतो. हाच नियम अ‍ॅक्वा योगा करण्याला ही लागू होतो.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही अ‍ॅक्वा योगाची मदत घेऊ शकता. फक्त यामध्ये सातत्य हवे जर हे सातत्य तुम्ही ठेवले तर याचा फायदा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी होऊ शकतो.

शरीर रिलॅक्स होते

अ‍ॅक्वा योगा केल्याने शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते. शिवाय, तणाव दूर होण्यास मदत होते. त्यामुळे, शरीर रिलॅक्स करण्यासाठी आणि मन:शांतीसाठी अ‍ॅक्वा योगा करणे फायदेशीर ठरते. शिवाय, शरीराचा योग्य बॅलन्स साधण्यासाठी अ‍ॅक्वा योगा नियमितपणे करणे फायद्याचे ठरते.

जर तुम्ही डिप्रेशनचा किंवा तणावाचा सामना करत असाल तर अ‍ॅक्वा योगा अवश्य करा. यामुळे, तुमची डिप्रेशनची समस्या दूर होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT