Health Care  esakal
लाइफस्टाइल

Health Care : वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे काळी मिरी, जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

आपल्या स्वयंपाकघरात अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो. या मसाल्यांमध्ये काळी मिरीचा ही समावेश आहे. अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये काळी मिरीचा आवर्जून वापर केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : आपल्या स्वयंपाकघरात अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो. या मसाल्यांमध्ये काळी मिरीचा ही समावेश आहे. अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये काळी मिरीचा आवर्जून वापर केला जातो.

यामुळे खाद्यपदार्थांना छान चव मिळते. छान चव मिळण्यासोबतच काळी मिरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळून येतात. काळी मिरीतील हे औषधी गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. आज आपण काळी मिरीचे आरोग्याला होणारे फायदे कोणते आहेत? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

काळी मिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमध्ये भरपूर खनिजे आणि जीवनसत्वांचा समावेश आढळून येतो. या काळ्या मिरीतील पोषकघटकांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे ही काळी मिरी व्हिटॅमिन अ आणि व्हिटॅमिन क चा प्रमुख स्त्रोत आहे.

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

वजन कमी करण्यामध्ये शरीरामधील चयापचयाची क्रिया अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावते. काळी मिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाइपरिन आणि अँटीओबेसिटीसाठी प्रभावी असणाऱ्या घटकांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी काळी मिरी अतिशय फायदेशीर ठरते.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही काळी मिरीचे सेवन करण्यास सुरूवात करा. तुम्ही विविध खाद्यपदार्थांमध्ये काळी मिरीचा वापर करू शकता किंवा काळी मिरीपासून काढा देखील बनवू शकता.

सांधेदुखीपासून आराम मिळतो

काळी मिरी सांधेदुखी कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. काळी मिरीमध्ये अँटीइंफ्लेमेंटरी आणि संधिवात विरोधी प्रभावी घटक आढळून येतात. सांधेदुखीमुळे होणारी वेदना आणि सूज कमी करण्यासाठी काळी मिरी फायदेशीर ठरते.

त्यामुळे, ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे, अशा लोकांनी आहारात काळी मिरीचा वापर करून बनवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा जरूर समावेश करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT