Health Care esakal
लाइफस्टाइल

Health Care : वजन कमी करण्यासाठी लाभदायी आहे मखाना, जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

वजन कमी करण्यासाठी मखाने खाणे हे अतिशय उपयुक्त आहे. मखान्यांमध्ये फायबर्स आणि प्रोटिन्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. शिवाय, मखान्यांमध्ये कमी कॅलरीज आढळून येतात.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : आजकालचे धावपळीचे जीवन, जंक फूडचे वाढलेलेल सेवन, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या सगळ्यात वजन वाढण्याचे प्रमाण लोकांमध्ये वाढले आहे. या वाढत्या लठ्ठपणामुळे लोक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे, हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक जण आहार आणि व्यायामाची खास काळजी घेत आहेत.

वजन कमी करण्यासाठी मखाने खाणे हे अतिशय उपयुक्त आहे. मखान्यांमध्ये फायबर्स आणि प्रोटिन्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. शिवाय, मखान्यांमध्ये कमी कॅलरीज आढळून येतात. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी देखील मखाने उपयुक्त आहेत. आज आपण मखान्यांचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

हृदयासाठी आहे फायदेशीर

मॅग्नेशिअमचा उत्तम स्त्रोत म्हणून मखान्याला ओळखले जाते. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मॅग्नेशिअम हे महत्वाचे खनिज आहे. मॅग्नेशिअममुळे आपल्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ज्यामुळे, हृदयाशी संबंधित असलेल्या रोगांचा धोका देखील कमी होतो. त्यामुळे, हृदयविकाराची समस्या असणाऱ्या लोकांनी आहारात मखान्यांचा समावेश करणे हे फायदेशीर ठरते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

मखान्यांमध्ये कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण कमी आढळून येते. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी मखान्यांचा आहारात समावेश करणे हे फायद्याचे ठरते. मखान्यांमध्ये प्रथिने आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते.

त्यामुळे, शरीराला ताकद ही मिळते आणि अनावश्यक फॅट्स किंवा कॅलरीज देखील शरीरात जमा होत नाहीत. त्यामुळे, ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्या लोकांनी त्यांच्या आहारात मखान्यांचा जरूर समावेश करावा.

पचनक्षमता सुरळीत राहते

मखान्यांचा आहारात समावेश केल्याने आपली पचनक्षमता सुरळीत राहण्यास मदत होते. पचनक्षमता सुरळीत राहिली की याचा फायदा वजन कमी करण्यासाठी आपोआप होतो.

मखाना हे फायबर्सचा उत्तम स्त्रोत असल्यामुळे पचनक्षमतेला सुरळीत ठेवण्यासाठी मदत करते. मखान्यांचे सेवन केल्याने पचनाच्या समस्या दूर होतात आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT