Green Salad Benefits  esakal
लाइफस्टाइल

Green Salad Benefits : हिवाळ्यात Green Salad खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?

थंडीच्या दिवसांमध्ये Green Salad खाण्याचे भरपूर फायदे आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Green Salad Benefits : निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम आणि योग्य आहार यांची सांगड असणे महत्वाचे आहे. हिवाळ्यामध्ये तर आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते. वातावरणातील बदलांमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे, योग्य आहार घेणे महत्वाचे आहे.

हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या यांचा वापर करून बनवण्यात आलेले हिरवे सॅलेड ज्याला आपण Green Salad असे म्हणतो. ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. शिवाय, हे हेल्दी असल्यामुळे, अनेकांना ते खायला आवडते.

पोषकघटकांनी परिपूर्ण असलेले हे Green Salad आपले वजन देखील नियंत्रित ठेवते आणि शरीराला अनेक समस्यांपासून दूर ठेवते. थंडीच्या दिवसांमध्ये हे Green Salad खाण्याचे भरपूर फायदे आहेत. चला तर मग जाणू घेऊयात Green Salad खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

पचनासाठी फायदेशीर

सध्याचे धकाधकीचे जीवन आणि चुकीचा आहार यामुळे, आरोग्यावर परिणाम होत आहे. या चुकीच्या आहारामुळे पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात. गॅसेस, अपचन, पोट फुगणे इत्यादी कारणांमुळे पचनक्षमता मंदावते.

त्यामुळे, यापासून सुटका मिळवण्यासाठी थंडीच्या दिवसांमध्ये तुमच्या आहारात ग्रीन सॅलेडचा समावेश करायला विसरू नका. या ग्रीन सॅलेडमध्ये विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि इतर पौष्टिक घटकांचा समावेश असतो.

या सर्व घटकांमध्ये व्हिटॅमिन्स, फायबर्स आणि पोषकघटकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे, पचनक्षमता सुधारण्यास मदत होते आणि पोटाच्या समस्या देखील दूर होतात.

त्वचेसाठी लाभदायी

बिघडलेल्या जीवनशैलीचा आणि चुकीच्या आहाराचा आपल्या आरोग्यासोबतच त्वचेवर देखील तितकाच परिणाम होतो. मात्र, आरोग्यासोबतच ग्रीन सॅलेड हे त्वचेसाठी देखील तितकेच लाभदायी आहे.

त्वचा निरोगी आणि चमकदार दिसण्यासाठी ग्रीन सॅलेड मदत करते. मात्र, यासोबतच तुम्हाला योग्य आहार आणि स्किनकेअरची ही काळजी घ्यावी लागते. ग्रीन सॅलेडमध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊन त्वचा फ्रेश आणि चमकदार दिसण्यास मदत होते. त्यामुळे, आजच तुमच्या आहारामध्ये ग्रीन सॅलेडचा समावेश करायला विसरू नका.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी ग्रीन सॅलेड हे फायदेशीर आहे. हे आपल्यातील अनेकांना माहित असेल. कारण, मूळात हिरव्या भाज्या आणि फळभाज्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण हे कमी असते, आणि जेव्हा आपण या ग्रीन सॅलेडचे सेवन करतो तेव्हा आपले पोट भरलेले राहते. त्यामुळे, आपल्याला लवकर भूक लागत नाही. परिणामी वजन कमी करण्यासाठी ग्रीन सॅलेड फायदेशीर ठरते.

हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांमध्ये असणाऱ्या कॅलरीज या लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त आहेत. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी ग्रीन सॅलेडचा आहारात अवश्य समावेश करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

Viral Video : महिलेने वाचविलेला जीव, अनेक वर्षांनी दिसताच सिंहांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Thalapathy Vijay चा मेगा ब्लॉकबस्टर शो! Modi च्या सभेपेक्षा जास्त गर्दी, पडद्यावरून थेट मैदानात कसा आला?

SCROLL FOR NEXT