Health Care esakal
लाइफस्टाइल

Health Care : हिवाळ्यात अंगदुखी जाणवतेय? मग, जाणून घ्या त्यामागची 'ही' कारणे

हिवाळ्यात या समस्या जरा जास्त जाणवू लागतात.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : बिघडलेली जीवनशैली आणि जास्त वेळ काम केल्यामुळे कधीकधी अचानक अंगदुखी जाणवते, किंवा अचानक पाय दुखू लागतात. हे दुखणं कधीकधी असहय्य होऊन जातं. हिवाळ्यात तर या समस्या जरा जास्त जाणवू लागतात.

खरे तर या मागे अनेक कारणे असू शकतात. आपल्या शरीरात पोषणाचा अभाव असेल तरी सुद्धा अंगदुखी आणि पायदुखीची समस्या जाणवू शकते. त्यामुळे, स्वत:ची काळजी घेणे महत्वाचे आहे.

मात्र, ही अंगदुखी आणि पाय दुखण्याची समस्या वारंवार होत असेल तर यावर वेळीच उपचार करणे आणि यामागील कारणे शोधणे महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात ही कारणे कोणती आहेत?

झोपेचा अभाव

जर तुमची झोप कमी झाली तर तुम्हाला थकवा जाणून शकतो. यासोबतच तुम्हाला अंगदुखी, पाठदुखी आणि पाय दुखण्याचा ही त्रास जाणवू शकतो. त्यामुळे, पूर्ण झोप घेणे हे अतिशय महत्वाचे आहे.

१८ वर्षे किंवा त्यापुढील व्यक्तींनी रोज ७ तासांची पुरेशी झोप घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. जर तुमची झोप व्यवस्थित झाली नाही की मग, अंगदुखी, थकवा आणि पायांमध्ये वेदना इत्यादी समस्या निर्माण होतात. यासोबतच झोप न झाल्यामुळे वजन वाढणे, डायबिटीज आणि हृदयरोगासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

व्हिटॅमीन डी आणि कॅल्शिअमची कमतरता

शरीरात व्हिटॅमीन डी आणि कॅल्शिअमची कमतरता असणे हे अंगदुखी, पायांमध्ये वेदना होण्यामागचे प्रमुख कारण आहे. हे टाळण्यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमीन डी आणि कॅल्शिअमने युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करा.

जर तुमच्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता असेल तर रक्तातील कॅल्शिअमची पातळी कमी होण्याची शक्यता असते. यामुळे, हाडांमध्ये तीव्र वेदना निर्माण होतात. परिणामी अंगदुखीची समस्या वाढते.

शरीरात व्हिटॅमीन डी ची कमतरता असेल तर मग स्नायू दुखणे, कमकुवतपणा आणि हातापायांमध्ये पेटके येण्याची शक्यता वाढते.

पाण्याची कमतरता

जर तुम्ही कमी पाणी पिले तर याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर होतो. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर थकवा जाणवणे, अशक्तपणा येणे आणि त्वचा निस्तेज दिसणे इत्यादी अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

जर तुमच्या शरीरात पाण्याची पातळी योग्य प्रमाणात नसेल तर रक्तातील ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर याचा परिणाम होतो. त्यामुळे, पाठ, कंबर आणि पाय दुखण्याची शक्यता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका, आता एसटीचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले संकेत...

Kolhapur Ministers Convoy Stopped : कोल्हापुरातील मंत्र्यांचे दिशादर्शक पाऊल; मुश्रीफ, आबिटकर, क्षीरसागरांनी वाहनांचा ताफा नाकारला, आमदार, खासदार बंद करणार का?

Chhatrapati Sambhaji Maharaj Procession : छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणूकीला पोलिसांनी परवानगी नाकारली, शिव-शंभू समर्थक आक्रमक, गारगोटीत तणाव

मोठी बातमी! मॉर्टगेज लोनसाठी शेतकऱ्यांना बॅंकांचे दरवाजे बंद; थकबाकी वाढल्याने बॅंकांनी आखडला हात; केवळ पीक कर्जवाटपालाच प्राधान्य, वाचा...

Panchang 15 May 2026 : आजचे पंचांग! शनि जयंती, अमावस्या आणि शुभ मुहूर्त; जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण राशीभविष्य

SCROLL FOR NEXT