Hair Split Ends esakal
लाइफस्टाइल

Hair Split Ends : केसांमध्ये वारंवार फाटे फुटतात? मग, जाणून घ्या ‘ही’ कारणे

केसांमध्ये फाटे फुटण्यामागे कोणती कारणे आहेत? हे महिलांना माहित नसते.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Split Ends : केसांची वाढ चालू झाली की केसांना फाटे फुटणे ही अतिशय सामान्य बाब झाली आहे. परंतु, अनेकदा केसांची ही समस्या महिलांसाठी डोकेदुखी ठरते. कारण, केसांना फाटे फुटल्यावर केस अधिक खराब दिसू लागतात.

मग, ही समस्या दूर करण्यासाठी महिला केस कापतात. मात्र, केस कापल्याने ही समस्या तात्पुरत्या स्वरूपात दूर होते. शिवाय, सतत केस कापल्याने केसांची वाढ खुंटण्याचा धोका ही असतो.

केसांना फाटे फुटल्यामुळे केस खराब तर दिसतातच, शिवाय, केस कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. ही समस्या दूर करण्यासाठी मग अनेक प्रकारचे उपाय केले जातात.

मात्र, केसांना फाटे फुटण्यामागची कारणे कोणती? हे अनेकांना माहित नसते. त्यामुळे, आज आपण केसांना फाटे फुटण्यामागची कारणे कोणती आहेत? ते जाणून घेणार आहोत.

केमिकल्सचा अतिवापर

केसांना सतत कलर केल्याने किंवा केसांवर केमिकलयुक्त शॅंम्पू किंवा कंडिशनर्सचा वापर केल्याने केसांना फाटे फुटण्याची शक्यता असते. या केमिकल्सने युक्त असलेल्या प्रॉडक्ट्सचा केसांच्या मुळांवर परिणाम होतो.

केसांची मुळे कमकुवत होऊन केसांना फाटे फुटू लागतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरगुती उपायांचा वापर करून ही समस्या दूर करू शकता.

हेअर ट्रिमिंग न करणे

जर तुम्ही वाढलेले केस बऱ्याच दिवसांपासून कट केले नाहीत किंवा हेअर ट्रिमिंग केले नाही तर मग, केस अधिक कोरडे होतात. एका रिसर्चनुसार, केस जास्त दिवस ट्रिम न केल्याने केसांमध्ये कोरडेपणा आणि फ्रिझीनेसपणा अधिक वाढतो.

शिवाय, यामुळे केसांमध्ये फाटे फुटण्याची समस्या अधिक प्रमाणात वाढते.अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जास्त वाढलेले केस हे ट्रिम केले तर ते केस चांगल्या पद्धतीने वाढतात आणि केसांमधील फाटे निघून जाण्यास मदत होते.

हेअर स्ट्रेटनर

आजकाल मुलींमध्ये हेअर स्ट्रेटनिंग करण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. हेअर स्ट्रेटनिंगचा वापर करून केस स्टाईल करणे, केस सरळ किंवा कर्ली करणे इत्यादी अनेक हेअरस्टाईल्स केल्या जातात.

परंतु, केसांवर सतत हेअर स्ट्रेटिनंगचा वापर केल्याने केस तुटण्याची समस्या निर्माण होते. शिवाय, केस अधिक कोरडे आणि फ्रिझी होतात. परिणामी, केसांमध्ये फाटे फुटण्याची समस्या होते आणि केस खराब दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT