Skin Care Tips esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? मग, बनवा ‘हे’ ड्रायफ्रूट फेसपॅक

चेहऱ्यावरील काळे डाग आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रूट्सची मदत घेऊ शकता. ड्रायफ्रूट्सपासून तुम्ही विविध प्रकारचे फेसपॅक्स बनवू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Skin Care Tips : हिवाळ्यात ड्रायफ्रूट्सचा आहारात समावेश करणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. ड्रायफ्रूट्समध्ये बदाम, काजू, मनुके, अक्रोड, अंजीर, पिस्ता आणि चारोळ्यांचा समावेश असतो. या सर्वांमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की आरोग्यासोबतच आपल्या त्वचेसाठी देखील हे ड्रायफ्रूट्स अतिशय फायदेशीर आहे.

या ड्रायफ्रूट्सचा त्वचेवर वापर केल्यावर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच, त्वचेवर एक प्रकारचा सुंदर ग्लो येतो. त्वचेवर ड्रायफ्रूट्सचा वापर केल्याने त्वचेचे योग्य प्रकारे पोषण होते.

चेहऱ्यावरील काळे डाग आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रूट्सपासून विविध प्रकारचे फेसपॅक्स बनवू शकता. कसे बनवायचे हे फेसपॅक्स? चला तर मग जाणून घेऊयात.

बदाम फेसपॅक

बदाम हे आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. बदाममध्ये असलेल्या व्हिटॅमीन ई मुळे आपल्या चेहऱ्याची लवचिकता आणि चमक वाढण्यास मदत होते. शिवाय, चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी बदाम फायदेशीर आहे.

बदामाचा फेसपॅक बनवण्यासाठी ५-६ बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर, सकाळी ते चांगल्या प्रकारे स्मॅश करून घ्या. नंतर, त्यामध्ये केळी स्मॅश करून घाला. आता हा फेसपॅक तयार आहे. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५-२० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर, चेहऱ्याचा मसाज करा आणि तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

अक्रोड फेसपॅक

अक्रोडचा वापर हा खास करून चेहऱ्याचे स्क्रबिंग करण्यासाठी केला जातो. त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या काढून टाकण्यासाठी तुम्ही अक्रोडचा चांगल्या प्रकारे वापर करू शकता.

अक्रोडमध्ये व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यामुळे, चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्या आणि मृत त्वचा दूर करण्यासाठी अक्रोड लाभदायी आहे. अक्रोडचा फेसपॅक बनवण्यासाठी ५-६ अक्रोड मिक्सरला चांगले बारीक करून घ्या किंवा ते क्रश करून घ्या. आता या बारीक केलेल्या अक्रोडमध्ये १-२ चमचे मध मिसळून त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर १५-२० मिनिटांसाठी लावा, त्यानंतर चेहरा धुवून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT