Bad Habits google
लाइफस्टाइल

Bad Habits : दिवसभरातल्या या सवयी तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी करतात

दिवसातून एकदाच चहा-कॉफी प्या. याने दिवसाची सुरुवात करू नका, रात्री चहा-कॉफी पिऊ नका, अन्यथा झोपेच्या चक्रावर परिणाम होईल.

नमिता धुरी

मुंबई : कोणतेही काम करण्यासाठी शरीरात ऊर्जा असणे अत्यंत आवश्यक असते. जर तुमच्या शरीरात उर्जा नसेल तर तुम्ही कोणतेही काम नीट करू शकणार नाही. तुमच्या दैनंदिन दिनचर्येवरही याचा परिणाम होईल. शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी योगासने, व्यायाम, योग्य आहार आणि इतर अनेक गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.

चांगल्या सवयींमुळे आपली ऊर्जा आणि आरोग्य सुधारते, तर काही सवयी आपल्या शरीरातील ऊर्जा कमी करतात. (these habits lower your energy how to increase energy )

जेव्हा आपल्याला थकवा जाणवतो, शरीरात ऊर्जा नाही असे वाटते, तेव्हा या संकेतांद्वारे आपले शरीर आपल्याला आपल्या सवयी बदलायला हव्यात असे सांगते. आयुर्वेदिक डॉक्टर नितिका कोहली यांनी या ऊर्जा कमी करणाऱ्या सवयींबद्दल सांगितले आहे, ज्या त्वरित सोडून दिल्या पाहिजेत.

दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफीने

बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. आयुर्वेदात ही सवय चांगली मानली जात नाही. आयुर्वेदानुसार आपण कॅफिनयुक्त पेयांपासून दूर राहिले पाहिजे. कॅफीनयुक्त पेये प्यायल्याने आपल्याला काही काळ उत्साही वाटू शकते परंतु प्रत्यक्षात ती चांगली सवय नाही.

दिवसातून एकदाच चहा-कॉफी प्या. याने दिवसाची सुरुवात करू नका, रात्री चहा-कॉफी पिऊ नका, अन्यथा झोपेच्या चक्रावर परिणाम होईल.

व्यायाम न करणे

ऑफिसच्या खुर्चीवर बसून दिवसभर काम करणाऱ्या लोकांपैकी तुम्हीही असाल, पण तुमची शारीरिक हालचाल नगण्य आहे, तर सावधान. शरीर निरोगी ठेवण्यासाठी चालणे, व्यायाम आणि योगासने यांसारख्या शारीरिक हालचाली करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही दीर्घकाळ शारीरिक हालचाली करत नसाल तर त्यामुळे तुमची ऊर्जाही कमी होते.

जेवायला वेळ नाही

निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. यासोबतच जेवण योग्य वेळी घेणेही खूप महत्त्वाचे आहे. काही लोकांना खाण्यापिण्यास वेळ नसतो, ते कधीही काहीही खातात. ही सवयही चांगली नाही. याशिवाय आयुर्वेदात थंड अन्न खाण्यास मनाई आहे.

सूर्यप्रकाशापासून दूर राहाणे

सूर्यप्रकाश आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो. शरीरातील अनेक हार्मोन्स आणि जीवनसत्त्वे यांचा समतोल राखण्यासाठी काही काळ सूर्यप्रकाशात राहावे. सकाळी काही मिनिटे सूर्यप्रकाशात राहणे चांगले मानले जाते. तुम्ही दिवसभर बंद घरात राहिल्यास त्याचा तुमच्या शरीरावरही वाईट परिणाम होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT