Relationship  sakal
लाइफस्टाइल

Relationship tips: या गोष्टी केल्यास जोडीदाराशी तुमचे नाते अधिक दृढ होईल, जाणून घ्या

प्रत्येक माणसाला जोडीदाराची गरज असते.

Aishwarya Musale

प्रेम हे निस्वार्थी असावे. प्रेमात एकमेंकावर विश्वास असायला हवा. प्रत्येक माणसाला जोडीदाराची गरज असते. नात्यावर शंका घेणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे, हा नेहमीच नाते कमकुवत करण्याचा दुवा असतो. म्हणूनच नात्यात विश्वास, प्रेम, काळजी घ्यायला शिका. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते मजबूत करण्यासाठी तुम्ही काही खास पद्धतींचा अवलंब करू शकता.

1. सरप्राईज द्या

सर्वांना सरप्राईज आवडतात. जोडीदाराच्या आवडीनिवडी जपा. तुम्ही सरप्राईजसाठी बाहेर डेट प्लॅन करू शकता. लंच किंवा डिनर एकत्र करणे हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये जोडीदाराची वागणूक महत्त्वाची भूमिका बजावते. तुमच्या जोडीदाराला निवांत राहायला आवडते, त्यामुळे त्याला गोंगाटाच्या वातावरणात घेऊन जाऊ नका.

2. खरेदीसाठी वेळ काढा

दोघेही एकमेकांना खरेदीसाठी घेऊन जाऊ शकतात. एकमेकांसाठी खरेदी करणे हा प्रेम दाखवण्याचा उत्तम मार्ग आहे. तुमच्या जोडीदारासोबत हँग आउट केल्याने तुमचा मूड सुधारेल. एकमेकांसाठी काहीतरी विकत घेतल्याने जोडीदाराला नक्कीच तुमच्याविषयी प्रेम वाटेल.

3. स्वयंपाक करा

एकत्र स्वयंपाक करू शकतात. पार्टनरच्या आवडत्या डिश बनवणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. तुमच्या जोडीदाराला स्वयंपाकघरात मदत करून तुम्ही त्याच्यासोबत वेळ घालवू शकता. स्वयंपाक झाल्यावर एकत्र खाण्याची मजा काही औरच असते. अनेकदा वेळेच्या कमतरतेमुळे एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळत नाही. पण दिवसातून एकदा तरी एकत्र नक्की जेवा.

4. वेडिंग अल्बम पहा

जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवायचा असेल, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लग्नाचे अल्बम किंवा व्हिडिओ पाहू शकता. तुमच्यासाठी खास राहिलेल्या चांगल्या आठवणींबद्दल तुमच्या जोडीदाराशी बोला.

5. फिरायला जा

तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही पूर्ण सुट्टीचे नियोजन करू शकत नसाल तर काळजी करू नका. शहराबाहेर अनेक रिसॉर्ट आणि गेटवे स्पॉट्स आहेत. वीकेंडला या ठिकाणांना भेट देता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सने १८ वर्षीय नाशिकच्या पोराला दिली पदार्पणाची संधी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलेय वादळी शतक, Video

ST Bus: एसटी प्रवासी-चालकांचे हाल! डिझेल तुटवड्यामुळे उत्पन्नातही घट; बीपीसीएलचा करारही संपला

Jalgaon Temperature : उष्‍णतेच्‍या झळा अधिक तीव्र! सात वर्षांनंतर एप्रिलमध्‍ये पारा ४४ अंशांवर, पुढील दोन दिवस झळा कायम

Akola Exam : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका घोटाळ्याने विद्यार्थ्यांचा संताप

Ice Cream and Chocolate Rate: चॉकलेट-आइसक्रीम महागणार! अनेक ब्रँड्स किंमती वाढवणार; किती रुपयांनी? जागतिक संकटाचा भारतावर परिणाम

SCROLL FOR NEXT