Hand Tanning  esakal
लाइफस्टाइल

Hand Tanning : हाताच्या टॅनिंगने त्रस्त आहात ? बदाम आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय

हातांवर उन्हामुळे काळे डाग पडले की ते लवकर जात नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

Hand Tanning : उन्हामध्ये फार काळ राहिल्यावर चेहऱ्यासोबतच हात देखील टॅन होतात. आजकाल अनेक महिला-पुरुषांना रोज कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडाव लागतं. अशावेळी, बाईक, स्कूटीवर प्रवास करणारे अनेक जण असतात. जे बाईक, स्कूटी रोज चालवतात किंवा ज्यांना रोज उन्हात फार फिरावे लागते, अशा लोकांना टॅनिंगची समस्या जाणवते.

चेहरा जरी स्कार्फने झाकलेला असला तरी हात मात्र टॅन होतात. हातांवर उन्हामुळे काळे डाग पडले की ते लवकर जात नाहीत. मग, हातांवरील टॅनिंग घालवण्याची आपली धडपड चालू होते. हातांवरील टॅनिंग आपण घरच्या घरी सहज घालवू शकतो. आज आम्ही तुम्हाला हातांवरील टॅनिंग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

हातांवरील टॅनिंग घालवण्यासाठीचे घरगुती उपाय खालीलप्रमाणे –

बदाम

५-६ बदाम एका भांड्यात घ्या. हे बदाम रात्रभर पाण्यात भिजू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी बदामामध्ये थोड दूध घालून ते मिक्सरला बारीक करा. ही बारीक केलेली पेस्ट हातांवर लावा. २०-२५ मिनिटांनंतर दोन्ही हात धुवून टाका. आठवड्यातून किमान ३ वेळा हा उपाय नक्की करा.

दही आणि हळद

एका भांड्यात अर्धा कप दही घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करा. हे दोन्ही घटक चांगल्य प्रकारे मिक्स करून घ्या. अंघोळ करण्यापूर्वी दोन्ही हातांवर हे मिश्रण लावा. २०-२५ मिनिटांनी दोन्ही हात धुवून टाका. त्यानंतर अंघोळ करा.

रोज नियमितपणे हा उपाय तुम्ही आठवडाभर केल्यावर हातावरील टॅनिंग निघून जाण्यास मदत होईल. चांगल्या परिणामांसाठी हा उपाय २ आठवडे नक्की करा.

लिंबू

लिंबाचा रस हा त्वचेच्या अनेक समस्यांसाठी फायदेशीर आहे. एका भांड्यात गरम पाणी घ्या, त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा. या मिश्रणात तुमचे दोन्ही हात २०-२५ मिनिटांसाठी बुडवून ठेवा. त्यानंतर, थंड पाण्याने हात धुवून टाका. हा उपाय २ आठवड्यांपर्यंत नियमितपणे केल्यास हातांवरील टॅनिंग दूर होण्यास मदत होईल.

कोरफड

त्वचेसाठी आणि केसांसाठी कोरफड अतिशय फायदेशीर आहे. चेहऱ्यावरील आणि हातांवरील टॅनिंग काढण्यासाठी कोरफडीचा प्रामुख्याने वापर केला जातो. हातावरील टॅनिंग काढण्यासाठी कोरफडीचा गर घ्या. रात्री झोपताना दोन्ही हातांवर हा कोरफडीचा गर लावा. सकाळी उठल्यानंतर दोन्ही हात थंड पाण्याने धुवून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT