Home Remedies for Tanning : सध्याच्या काळात वाढलेले प्रदूषण, धूळ आणि उन्हाचा तडाखा यांचे प्रमाण वाढले आहे. घराबाहेर पडताना आपण त्वचेवर आवर्जून सनस्क्रिन लावतो. मात्र, कित्येकदा हात आणि पायांकडे अनेक महिलांचे दुर्लक्ष होते. चेहऱ्याला सनस्क्रिन लावल्यानंतर काही जणी आठवणीने हाताला सनस्क्रिन लावायला विसरत नाहीत. पाय मात्र, तसेच राहतात.
उन्हामुळे पाय देखील काळे पडतात. पायावरची त्वचा टॅन होते. त्यामुळे, पाय काळे दिसू लागतात. पाय काळे पडले की अनेक जणी शॉर्ट ड्रेस किंवा वनपीस घालायला टाळाटाळ करतात.
मग, अशावेळी अनेक महिला पायांवरील टॅनिंग काढण्यासाठी पार्लरमध्ये जातात. मात्र, तुम्ही घरच्या घरी काही गोष्टींचा वापर करून हे टॅनिंग सहज काढू शकता आणि तुमचे पाय चमकवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या घरगुती उपायांबद्दल.
पायांचा काळेपणा दूर करण्यासाठी हळद अतिशय फायदेशीर आहे. आरोग्यासोबतच हळद त्वचेसाठी अतिशय लाभदायी आहे. पायांचे टॅनिंग काढण्यासाठी हळद आणि दह्याचा पॅक फायदेशीर ठरतो.
हा उपाय करण्यासाठी अर्धी वाटी दह्यामध्ये १ चमचा हळद मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या पायांवर लावा. १५-२० मिनिटे तसेच राहुद्या. नंतर, पाय स्वच्छ धुवा.
त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर आहे. बेकिंग सोड्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. ज्यामुळे, टॅनिंग निघून जाण्यास मदत होते. लिंबाचा रस आपल्या त्वचेसाठी अतिशय लाभदायी आहे. लिंबाच्या रसामुळे त्वचेवरील काळपटपणा दूर होण्यास मदत होते.
हा उपाय करण्यासाठी ३ चमचे लिंबाच्या रसामध्ये २ चमचे बेकिंग सोडा मिक्स करा. आता ही पेस्ट पायांवर १५-२० मिनिटांसाठी ठेवा, नंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.