homemade hair pack esakal
लाइफस्टाइल

Homemade hair packs : केसांच्या गळतीने त्रस्त आहात ? बटाटा आहे मदतीला ! घरच्या घरी बनवा ‘हे’ हेअर पॅक

केस गळती, केस पांढरे होणे आणि केस पातळ होणे इत्यादी अनेक समस्या सध्या महिलांना भेडसावत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

रोजचे धावपळीचे आयुष्य, बिघडलेली जीवनशैली, वाढते प्रदूषण या सगळ्यांचा परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो. केस गळती, केस कोरडे होणे, केस पांढरे होणे आणि केस पातळ होणे इत्यादी अनेक समस्या सध्या महिलांना भेडसावत आहेत.

केसांच्या वाढीसाठी आपण नाना उपाय करतो. केसांना नियमित तेल लावणे, शॅम्पू करणे, कंडिशनर लावणे अशा अनेक गोष्टी आपण करतो. विविध फळांपासून आपण घरगुती पद्धतीने हेअर पॅक्स बनवू शकतो. हेअर पॅकमुळे केसगळती कमी होऊन केसांच्या वाढीस चालना मिळते.

केसांसाठी विविध प्रकारचे हेअर पॅक बाजारात उपलब्ध आहेत. परंतु, तुम्ही घरच्या घरी देखील हेअर पॅक बनवू शकता. फळे आणि घरातील मोजक्या गोष्टींचा वापर करून तुम्ही केसांसाठी हेअर पॅक तयार करू शकता. चला तर मग आज आपण घरगुती पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या हेअर पॅकबद्दल जाणून घेऊयात.

बटाटा हेअर पॅक

बटाट्याचा रस जसा चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे, तसाच बटाट्याचा हेअर पॅक हा केसांसाठी उपयुक्त आहे. हा हेअर पॅक बनवण्यासाठी एक मोठा बटाटा घ्या. त्याची सालं काढून बटाटा स्मॅश करून त्याचा रस काढा.

आता या बटाट्याच्या रसामध्ये दोन मोठे चमचे मध आणि कोरफडीचा गर घाला. आता हे सर्व मिश्रण एकत्र करा. त्यानंतर हे मिश्रण केसांना लावून छान मसाज करा. नंतर, हा हेअर पॅक तासाभरासाठी केसांवर ठेवा आणि गरम पाण्याने केस धुवून टाका. या हेअर पॅकमुळे कमजोर केसांची समस्या कमी होऊन केसांची वाढ होण्यास मदत होईल.

कढीपत्ता हेअर पॅक

स्वयंपाक घरात बनवल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाला ज्याच्यामुळे चव येते तो म्हणजे कढीपत्ता होयं. कढीपत्ता ही वनस्पती औषधी तर आहेच मात्र, केसांसाठी देखील कढीपत्ता लाभदायी आहे. कढीपत्त्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते आणि पांढऱ्या केसांची समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते.

कढीपत्त्याची काही पाने घ्या, त्यामध्ये हिरवी मेथी आणि आवळा घ्या. हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याची पेस्ट करा. जर ही पेस्ट जाडसर झाली तर त्यात गरजेनुसार पाणी घालून आणखी बारीक पेस्ट करा. आता ही पेस्ट २०-३० मिनिटांसाठी केसांवर लावा. त्यानंतर केस कोमट पाण्याने धुवून टाका.

बेसन प्रोटिन हेअर पॅक

बेसनाचा वापर करून आपण चेहऱ्यावर फेस पॅक लावतो. बेसन जितकं त्वचेसाठी फायदेशीर आहे तितकचं ते केसांसाठी फायदेशीर आहे.

हा हेअर पॅक करण्यासाठी ३ मोठे चमचे बेसन घ्या. आता त्यात एक फेटलेलं अंड, १ चमचा लिंबाचा रस आणि १ कप दही मिक्स करा. तुमचा हेअर पॅक तयार आहे. हा हेअर पॅक केसांना लावा आणि अर्धा तास केसांवर तसाच राहुद्या. त्यानंतर, केस धुवून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Summer Heatwave : राज्यात उन्हाच्या झळा तापदायक! सोलापूर, सांगलीत उष्ण; उकाडा कायम राहणार

Asha Bhosle : स्वरनक्षत्र निमाले! आशा भोसले यांचे निधन, मुंबईत आज अंत्यसंस्कार

Chhatrapati Sambhajinagar: नवीन जल योजना ; चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मेनहोलचे काम पूर्ण; नक्षत्रवाडीत आज सायंकाळपर्यंत पाणी

Nashik IT Company Conversion Case: नाशिक धर्मांतर प्रकरणात खास मोड्यूल अन् फंडिंग? केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय चौकशी

SCROLL FOR NEXT