Iron Deficiency
Iron Deficiency esakal
लाइफस्टाइल

Iron Deficiency : लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आलाय? मग, आहारात ‘या’ होममेड ज्यूसचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

Iron Deficiency : नियमितपणे व्यायाम आणि योग्य संतुलित आहार घेतला की आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. मात्र, सध्याचे धकाधकीचे जीवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाच्या अभावामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. यामध्ये शरीरातील लोहाची कमतरता याचा ही समावेश आहे.

शरीरात लोहाची कमतरता म्हणजे रक्ताची कमतरता होय. हे एक अशक्तपणाचे लक्षण आहे. या समस्येकडे दुर्लक्ष करणे, म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे, या समस्यांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती पेयांची मदत घेऊ शकता. हे घरगुती पद्धतीने बनवलेले ज्यूस तुमची लोहाची कमतरता भरून काढतील. चला तर मग जाणून घेऊयात या होममेड ज्यूसबद्दल.

बीटाचा ज्यूस

बीटामध्ये पोषकतत्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळून येतो. हे पोषकतत्वांनी समद्ध असलेले बीट आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. बीटाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत होते.

लोहाचा उत्तम स्त्रोत म्हणून बीटाला ओळखले जाते. बीटाचा ज्यूस प्यायल्याने तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होईल. या बीटाच्या ज्यूसचा समावेश तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये करू शकता.

सीताफळाचा ज्यूस

सीताफळ खायला कुणाला आवडत नाही, हे फळ खायला सगळ्यांनाच आवडते. सीताफळामध्ये पोषकतत्वांचे विपुल प्रमाण आढळून येते. चवीला गोड असणाऱ्या या फळाचा ज्यूस देखील तितकाच स्वादिष्ट लागतो.

अँटिऑक्सिडंट्स आणि विविध प्रकारच्या खनिजांनी समृद्ध असलेले हे फळ आपल्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत करते. त्यामुळे, तुमच्या आहारात या सीताफळाच्या ज्यूसचा जरूर समावेश करा.

पालकचा ज्यूस

पालक या हिरव्या पालेभाजीमध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म आढळून येतात. लोह, व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन बी ६, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, इतर खनिजे आणि विविध प्रकारच्या जीवनसत्वांचा पालकमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आढळून येतो.

पोषकतत्वांचे भांडार असलेली ही पालक आपल्या शरीरात लोहाचा पुरवठा करून अशक्तपणा दूर करण्यास मदत करते. त्यासोबतच शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. ज्या लोकांना शरीरात लोहाची कमतरता आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारात पालकचा जरूर समावेश करावा.

पालकचा ज्यूस देखील तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता. रोजच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणात तुम्ही पालकचा ज्यूस पिऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : अयोध्येत भाजप पिछाडीवर! पण केरळमध्ये 'या' जागेवर मिळवली अनपेक्षित आघाडी

Maharashtra Lok Sabha Election Results Live : संभाजीनगरमधून तिसऱ्या फेरीत संदिपान भुमरेंना २२८ मतांची आघाडी

T20 World Cup: अफगाणिस्तानने प्रतिस्पर्ध्यांना अवघ्या 58 धावांत गुंडाळलं अन् विजयासह 'हा' मोठा विक्रमही केला नावावर

Maharashtra lok sabha election 2024 result : काकाच ठरले पुतण्यावर वरचढ; अजित पवारांचा प्रयोग फसला?

Varanasi Loksabha Election Result 2024: सुरुवातीच्या कलांमध्ये मोदींना घाम फोडणारे अजय राय कोण? तीनवेळा राहिलेत भाजपचे आमदार

SCROLL FOR NEXT