Best Lipstick Shades esakal
लाइफस्टाइल

Best Lipstick Shades : गुलाबी रंगाच्या कपड्यांवर खुलून दिसतील ‘या’ लिपस्टिकच्या शेड्स, मिळेल तुम्हाला परफेक्ट लूक

Best Lipstick Shades : स्टायलिश दिसण्यासाठी तुमच्या आऊटफीटसोबतच तुमची हेअरस्टाईल, ज्वेलरी आणि मेकअप देखील तितकाच महत्वाचा असतो.

Monika Lonkar –Kumbhar

Best Lipstick Shades : आपला लूक स्टायलिश दिसावा? असे प्रत्येक महिलेला वाटते. मग, स्टायलिश दिसण्यासाठी केवळ स्टायलिश आऊटफीट हवा, असे अजिबात नाही. स्टायलिश दिसण्यासाठी तुमच्या आऊटफीटसोबतच तुमची हेअरस्टाईल, तुमची ज्वेलरी आणि तुमचा मेकअप देखील तितकाच महत्वाचा असतो.

जेव्हा या सर्व गोष्टी जुळून येतात, तेव्हा खरे तर तुमचा लूक स्टायलिश दिसतो. स्टायलिश लूक करताना तुम्हाला मेकअपची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. मेकअपबद्दल बोलायचे झाल्यास महिला खास करून लिपस्टिक लावण्यावर भर देतात. लिपस्टिकशिवाय कोणताही लूक हा अपूर्ण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

लिपस्टिकची निवड करण्यापूर्वी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या आऊटफीटचा रंग लक्षात घ्यावा लागेल. तुमच्या आऊटफीटला मॅच होणारी लिपस्टिकची निवड करणे, अधिक महत्वाचे आहे.

मात्र, गुलाबी रंगाच्या कपड्यांवर कोणती लिपस्टिक लावावी? असा प्रश्न अनेक तरूणींना पडतो. तुम्ही चिंता करू नका, आज आम्ही तुम्हाला गुलाबी रंगाच्या कपड्यांवर खुलून दिसणाऱ्या लिपस्टिक शेड्सबद्दल सांगणार आहोत. कोणत्या आहेत त्या लिपस्टिक शेड्स? चला तर मग जाणून घेऊयात.

पीच कलर लिपस्टिक

आजकाल अनेक तरूणींना सनकिस्ड लूक आवडतो. तसा, लूक करण्यावर अनेक महिला भर देताना दिसतात. जर तुम्ही दिवसा डेटवर किंवा कोणत्याही कार्यक्रमात जाणार असाल आणि फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करणार असाल तर पीच कलरची लिपस्टिकची शेड ट्राय करू शकता.

यामध्ये लिपस्टिकचा मॅट फिनिश लूक निवडायला विसरू नका. फिकट गुलाबी रंगाच्या ड्रेसवर लिपस्टिकचा हा शेड अधिक खुलून दिसतो. (Peach Colour Lipstick)

ब्लश पिंक कलर

जर तुम्ही ब्लश पिंक कलरची किंवा बेबी पिंक कलरची साडी किंवा आऊटफीट परिधान करणार असाल तर त्यावर ब्लश पिंक कलरची लिपस्टिक खूपच सुंदर दिसेल. यात काही शंका नाही. अभिनेत्री क्रिती सेनॉन या पिंक साडीवर मॅच होणारी बल्श पिंक कलरची लिपस्टिक लावली आहे. तिचा हा लूक पाहून तुम्हाला अंदाज येईलच की तुमचा लूक देखील या लिपस्टिकच्या शेडमुळे खुलून दिसणार आहे.

विशेष म्हणजे बल्श पिंक कलरची ही लिपस्टिक अनेक डार्क आणि लाईट कलरच्या आऊटफीट्सवर उठून दिसते. या लिपस्टिकच्या शेडमुळे तुम्हाला नैसर्गिक आणि चमकदार लूक मिळेल, यात काही शंका नाही. (Blush Pink Colour)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरात ६० लाखांहून अधिक किमतीचा गोवंश जप्त; १३१ गोवंशांची सुटका, ८ आरोपींवर ४ गुन्हे दाखल

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीचे वादळ पाहून काव्या मारनच्या चेहऱ्याचा रंग उडालेला... Boss Baby बाद होताच कशी होती तिची रिअ‍ॅक्शन ते पाहा... Video Viral

Koregaon Park Raid : पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! वेश्याव्यवसाय करणाऱ्या केनियाच्या 4 तरुणींची सुटका; कोरेगाव पार्क हादरलं

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT