Weight Loss Tips esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिणे 'या' लोकांना पडू शकतं महागात,वेळीच सावध व्हा

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिणे या लोकांना महागात पडू शकतं

सकाळ ऑनलाईन टीम

Weight Loss Tips: हल्ली वजन वाढण्याच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. काहींचे बसल्या ठिकाणी काम करून वजन वाढते तर काहींचे चुकीच्या जीवनशैलीमुळे वजन वाढते. त्यासाठी अनेक लोक वेगवेगळे उपायही करत असतात. मात्र वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिणे या लोकांना महागात पडू शकतं.

हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी हे लोकांचं आवडतं ड्रिंक असू शकतं. मात्र याने काहींना समस्या होऊ शकतात याची कल्पना तुम्हाला आहे काय? याने काहीवेळा तुमच्या पोटात जळजळ व्हायला लागते. मध आणि लिंबूमध्ये हाय अँटिऑक्सिडंट्स असतात. जे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यासाठी मदतनीस ठरतात. फ्री रॅडिकल्स शरीरात पचनक्रियेदरम्यान तयार होतात. जे शरीरासाठी फार हानिकारक असतात.

रोज सकाळी लिंबू पाणी आणि मध पिण्याचा डॉक्टर सल्ला देतात. मात्र मधुमेहाच्या रूग्णांनी या ड्रिंकच्या दूरच राहावे. मध हे गोड असतं. आणि मधुमेहाच्या रूग्णांना गोड पदार्थांच्या दूरच राहावे. (Health News)

बॅरिएट्रिक सर्जरी करणाऱ्या लोकांनी चुकूनही हे ड्रिंक पिऊ नये

जर तुमची अलीकडेच बॅरिएट्रिक सर्जरी झाली असेल तर लिंबू पाणी पिणे टाळा. ही सर्जरी वजन कमी करण्यासाठी केली जाते. तज्ज्ञांच्या मते, ऑपरेशनच्या लगेच नंतर साखरेचे सेवन केल्यानं डंपिंग सिंड्रोम होऊ शकतो. जो फार घातक ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी

माजी सरन्यायाधीश राज्यसभेतून निवृत्त, ६ वर्षात एकही प्रश्न विचारला नाही, चर्चेत एकदाच सहभाग त्यातही वादग्रस्त विधान

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar News: बारवेलगत अतिक्रमणाचा डाव उधळला; महापालिकेची कारवाई; समर्थनगरमध्ये पत्र्याचे शेड हटविले

Sambhajinagar Hospital News: घाटीवरील ताण कमी होणार; १८९ कोटींचे माता-बाल रुग्णालय लवकरच सुरू; दूध डेअरी परिसरात अत्याधुनिक महिला रुग्णालय

SCROLL FOR NEXT