Pomegranate Face Packs esakal
लाइफस्टाइल

Pomegranate Face Packs : चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर करण्यासाठी डाळिंब आहे फायदेशीर; जाणून घ्या ‘हे’ घरगुती फेसपॅक्स

डाळिंबामध्ये अ‍ॅंटीएजिंग गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेसाठी फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Pomegranate Face Packs : डाळिंब हे फळ खायला सगळ्यांनाच आवडते. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, डाळिंब हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का ? की आरोग्यासोबतच डाळिंबाचे त्वचेसाठी देखील अनेक फायदे आहेत.

डाळिंबामध्ये अ‍ॅंटीऑक्सिडंन्ट्स आणि व्हिटॅमिन्सचे मुबलक प्रमाण आढळून येते. शिवाय, या फळांमध्ये आढळून येणाऱ्या अ‍ॅंटीएजिंग गुणधर्मांमुळे त्वचेसाठी हे फळ अतिशय लाभदायी आहे.

चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्या आणि पुरळ इत्यादी समस्या दूर करण्यासाठी डाळिंबाचा वापर केला जाऊ शकतो. चेहऱ्यावरील काळ्या डागांची समस्या दूर करण्यासाठी डाळिंबाचे फेसपॅक्स फायदेशीर आहेत. या फेसपॅक्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

लिंबू आणि डाळिंब

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चे भरपूर प्रमाण आढळून येते. त्वचेवर उजळपणा आणण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर आहे. लिंबाचा आणि डाळिंबाचा फेस पॅक बनवण्यासाठी डाळिंबाच्या सालींची पावडर करून घ्या आणि त्यामध्ये लिंबाचा रस मिसळा. तुमचा फेसपॅक तयार आहे. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका.

डाळिंब आणि मध

मधामध्ये पोषकघटकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. मधामुळे त्वचेवर ग्लो येण्यास मदत होते आणि त्वचेचे चांगल्या प्रकारे पोषण होते. डाळिंब आणि मधाचा फेसपॅक बनवण्यासाठी डाळिंबाच्या दाण्यांची पेस्ट करून घ्या.

या पेस्टमध्ये १ चमचा मध मिसळा. आता तुमचा फेसपॅक तयार आहे. हा फेसपॅक चेहऱ्यावर २५ मिनिटांसाठी लावा त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.

दही आणि डाळिंब

दही आपल्या त्वचेला पोषण देण्याचे काम करते. दह्यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होते. दही आणि डाळिंबाचा फेसपॅक बनवण्यासाठी १ डाळिंब घ्या, त्याची पेस्ट करून घ्या. आता या पेस्टमध्ये ३-४ चमचे दही मिक्स करा. तुमचा फेसपॅक तयार आहे.

हा फेसपॅक चेहऱ्यावर आणि गळ्याजवळ लावा. त्यानंतर, २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. अधिक चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हा फेसपॅक आठवड्यातून ३ वेळा लावू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT