Dry-Frizzy Hairs esakal
लाइफस्टाइल

Remedies for Dry-Frizzy Hairs : कोरड्या केसांमुळे त्रस्त आहात? मग ‘या’ घरगुती उपायांची घ्या मदत

प्रदूषण, धूळ आणि वातावरणातील बदलांचा केसांवर परिणाम होतो.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : केसांमुळे आपल्या व्यक्तिमत्वाला एक छान लूक येतो. आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी केस महत्वाची भूमिका बजावतात. मात्र, केसांची योग्य निगा राखली गेली नाही तर केसांच्या समस्या निर्माण होतात.

केसगळती, केस कोरडे होणे आणि केस फ्रिझी होणे इत्यादी अनेक समस्या होण्याची शक्यता असते. प्रदूषण, धूळ आणि वातावरणातील बदलांचा केसांवर परिणाम होतो. आजकाल केस कोरडे होणे आणि फ्रिझी केसांच्या समस्या वाढल्या आहेत.

कोरड्या केसांची आणि फ्रिझी केसांची समस्या दूर करण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात हे घरगुती उपाय.

मध आणि दूध

मध आणि दूध हे दोन्ही घटक आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहेत. मधामुळे केसांना चांगले कंडिशनिंग मिळते आणि दूधामुळे केसांचे चांगले पोषण होण्यास मदत होते.

हा उपाय कोरड्या केसांवर करण्यासाठी ५-६ चमचे दूध घ्या. त्यामध्ये २-३ चमचे मध घाला. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि केसांवर लावा. ३० मिनिटांसाठी हा हेअर मास्क चेहऱ्यावर ठेवा नंतर केस धुवून टाका.

मेहंदी

कोरड्या आणि फ्रिझी केसांसाठी मेहंदी अतिशय उत्तम उपाय आहे. मेहंदीमुळे केस मऊ होतात आणि केसांना छान चमक येते. तसेच, केसांचे उत्तम कंडिशनिंग होते.

मेहंदीचा उपाय करण्यासाठी १ कप चहा पावडरच्या पाण्यामध्ये ५-७ चमचे मेहंदी पावडर मिक्स करा. त्यात हवे असल्यास दही मिक्स करा. आता हे सर्व घटक चांगल्या प्रकारे एकत्र करा. तुमचा हेअर मास्क तयार आहे. हा हेअर मास्क केसांवर लावा आणि २ तासांनंतर केस धुवून टाका.

केळी

केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वांचा समावेश असतो. व्हिटॅमिन्स, कर्बोदके, पोटॅशिअम, जस्त आणि लोह याचे विपुल प्रमाण केळ्यांमध्ये आढळून येते. त्यामुळे, आरोग्यासोबतच केळी, त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहेत.

केळीचा उपाय केसांवर करण्यासाठी १ केळी घ्या, त्यामध्ये ३-४ चमचे दही घाला. २ चमचे गुलाबपाणी आणि १ चमचा लिंबाचा रस त्यामध्ये मिसळा. आता तुमचा हेअर पॅक तयार आहे. हा हेअर पॅक केसांवर लावा. १ तासानंतर केस धुवून टाका.

या हेअर पॅकमुळे केसांना छान चमक येते आणि कोरड्या केसांची समस्या दूर व्हायला मदत होते. चांगल्या परिणामांसाठी हा हेअर पॅक केसांवर आठवड्यातून २ वेळा लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT