Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : घनदाट आणि मजबूत केसांसाठी तुमच्या हेअर केअर रूटीनमध्ये 'या' सवयींचा करा समावेश

वाढत्या थंडीचा परिणाम आरोग्यासोबतच आपल्या केसांवर आणि त्वचेवर ही होतो. या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडते आणि केस देखील कोरडे होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. या वाढत्या थंडीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या सुरू होतात. मात्र, या वाढत्या थंडीचा परिणाम आरोग्यासोबतच आपल्या केसांवर आणि त्वचेवर ही होतो. या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडते आणि केस देखील कोरडे होतात. त्यामुळे, त्वचेसोबतच केसांची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.

हिवाळ्यात केस कोरडे होणे, केसांमध्ये फ्रिझीनेसपणा वाढणे इत्यादी अनेक समस्या निर्माण होतात. मात्र, या थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या हेअर केअर रूटीनमध्ये काही सवयींचा अवलंब केल्यास केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. कोणत्या आहेत त्या सवयी? चला तर मग जाणून घेऊयात.

केसांना वेळेवर तेल लावा

केसांची योग्य प्रकारे देखभाल करण्यासाठी केसांना तेल लावणे हे अतिशय गरजेचे आहे. यासाठी तुम्ही टाळूची कोमट तेलाने मालिश करणे महत्वाचे आहे. टाळूची मालिश केल्यानंतर ४०-४५ मिनिटांनी केसांवर शॅंम्पू लावा. त्यानंतर केस धुवा. यामुळे, केसगळती कमी होण्यास मदत होऊ शकेल.

आयुर्वेदिक शॅंम्पूचा करा वापर

केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तुम्ही केमिकल्सने युक्त असलेल्या शॅंम्पूपासून दूर रहायला हवे. कारण, या केमिकल्सने युक्त असलेल्या शॅंम्पूमुळे केसांवर वाईट परिणाम होतो आणि केसांच्या समस्या सुरू होतात.

त्यामुळे, केसांवर आयुर्वेदिक शॅंम्पूचा वापर करायला विसरू नका. मात्र, आयुर्वेदिक शॅंम्पू केसांवर डायरेक्ट लावू नका, त्याआधी तो पाण्यात मिसळा आणि मग केसांवर लावा.

केसांना लावा कंडिशनर

केसांना तेल लावणे जितके महत्वाचे आणि फायद्याचे आहे, तितकेच कंडिशनर केसांना लावणे हे गरजेचे आहे. केसांना कंडिशनर लावल्यामुळे केसांमधील फ्रिझीनेसपणा कमी होण्यास मदत होते. यासाठी केसांना शॅंम्पू लावल्यानंतर केस चांगल्या प्रकारे धुवा. त्यानंतर, केसांना कंडिशनर लावा. ५-१० मिनिटांनी केस धुवा. यामुळे, केस तुटण्याची समस्या देखील कमी होईल.

संतुलित आहार महत्वाचा

केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही संतुलित आहार घेणे फायद्याचे आहे. संतुलित आहार घेतल्यामुळे केसांना चांगले पोषण मिळण्यास मदत होते. त्यामुळे, आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, व्हिटॅमिन्स आणि कडधान्यांचा समावेश करायला विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT