Pregnancy Tips esakal
लाइफस्टाइल

Pregnancy Tips : गरोदरपणात काम करताना काय काळजी घ्यावी? वर्किंग वुमनसाठी ‘या’ खास टिप्स

गरोदरपणात प्रत्येक महिलेने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे आई होणे हा असतो. गरोदरपणात प्रत्येक महिलेने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हा काळ जितका सुखद असतो तितकाच तो चॅलेंजिंग देखील असतो.

खास करून जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तेव्हा हे सर्व चॅलेंजिंग ठरू शकतं. मात्र, हे काही प्रकरणामध्ये लागू होत तर काही प्रकरणांमध्ये हे चॅलेंजिग नसू शकतं. कारण, हे सर्व तुमच्या जॉब प्रोफाईलवर अवलंबून असत.

गरोदर असताना जर तुमच्या डॉक्टरांनी काम करण्याचा सल्ला दिला तर तुम्ही तिसऱ्या महिन्यातही काम करू शकता. या दरम्यान नोकरदार महिलांनी अधिक सावधानता बाळगणे आवश्यक आहे. आज आपण वर्किंग वुमनने गरोदर असताना काम करताना कशी काळजी घ्यावी ? त्याबद्दल काही टिप्स जाणून घेणार आहोत.

रोज छान झोप घ्या

झोप नीट झाली तर आपले आरोग्य चांगले राहते. गरोदर महिलांनी या काळात झोपेची विशेष काळजी घ्यायला हवी. यासाठी १०-११ तासांची पुरेशी झोप घेणे हे तितकेच महत्वाचे आणि गरजेचे आहे. ज्यामुळे गर्भातील बाळाला योग्य प्रकारे रक्तपुरवठा होतो.

हलका व्यायाम करा

या काळात योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि हलका व्यायाम करणे हे अतिशय महत्वाचे आहे. अनेक महिला फक्त विश्रांतीवर भर देतात आणि व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. हे करणे चुकीचे आहे पुरेश्या विश्रांतीसोबत हलका व्यायाम करणे हे त्या गरोदर महिलेसाठी आणि तिच्या बाळासाठी आवश्यक आहे.

त्यामुळे, वर्किंग वुमनने ऑफिसमध्ये काम करताना मधल्या काळात थोडा ब्रेक घेऊन थोड चालायला हवं. यामुळे, पायांची सूज कमी होण्यास मदत होते. या काळात जास्त व्यायाम, जास्त काम आणि जड वस्तू उचलणे टाळा.

आहाराकडे लक्ष द्या

सकस आहार घेणे हे गरोदर महिलांसाठी अतिशय महत्वाचे आहे. कारण, हा आहार बाळाच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतो. त्यामुळे, दिवसातून किमान ५ वेळा निरोगी आहार घ्या. या आहारामध्ये फळे, कडधान्ये, दही, दूध आणि अंडी यांसारख्या पौष्टिक घटकांचा समावेश असू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही आहाराचे योग्य नियोजन देखील करू शकता.

जास्त काम करू नका

वर्किंग वुमन म्हणून काम करताना महिलांनी त्यांच्या कामाची आणि डॉक्टरांकडे असणाऱ्या अपॉईंटमेंटची एक यादी बनवा. तुमचं एक शेड्यूल बनवा आणि या शेड्यूलप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करा.

जेणेकरून तुम्ही जास्त काम करण्याचे टाळू शकालं. सर्वात महत्वाचे म्हणजे कामाच्या दरम्यान एक छोटा ब्रेक घ्या आणि हा तणाव घालवण्यासाठी आणि विश्रांतीसाठी एक वेळ ठरवून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांना रोज 550 कोटींचा तोटा! सरकारच्या दाव्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

Marital Dispute: पत्नीच्या प्रेमसंबंधातून धर्मांतराचा कट? पत्नीच्या वागण्यात बदल झाल्याचा पतीचा दावा, मुंबईतील बँकेकडे मोठी मागणी

Panhala Accident News : नातीचा चेहरा पाहून परतणाऱ्या आजीवर काळाचा घाला, पन्हाळ्यातील घटनेने हळहळ

SRH vs RR, Eliminator: "नेट्समध्ये वैभवला मी...", जोफ्रा आर्चरचे १५ वर्षांच्या सूर्यवंशीला आऊट करण्याबद्दल भन्नाट उत्तर; VIDEO

SCROLL FOR NEXT