लाइफस्टाइल

Panic Attack : तुम्हालाही पॅनिक अटॅक येतो का? मग या उपायांनी मिळवा आराम

पॅनिक अटॅकपासून स्वत:ला कसे सुरक्षित ठेवावे...

Aishwarya Musale

ताणतणाव, नैराश्य, चिंता... हे शब्द गेल्या काही वर्षांत खूप लोकप्रिय झाले आहेत. त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, पण त्यामुळे पीडित लोकांची मानसिक स्थिती आणि मनःस्थिती अगदी सारखीच असते. गेल्या काही वर्षांपासून अनेक वेगवेगळे आजार डोकं वर काढत आहेत. त्यातच आता ‘पॅनिक अटॅक’चंही प्रमाण वाढत आहे.

यामध्ये आपल्याला अचानकच खूप भीती वाटणे किंवा सतत कसली ना कसली काळजी वाटू लागते. तसेच श्वास घेण्यास त्रास होणे, जास्त घाम येणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि नियंत्रणाबाहेर जाणे हा ‘पॅनिक अटॅक’असू शकतो. ‘पॅनिक अटॅक’ हा मानसिक आरोग्याशी संबंधित आहे.

पॅनिक अटॅक घातक नसले तरी तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीत स्वत:ला कसे सांभाळायचे ते जाणून घेऊयात.

दीर्घ श्वास घ्या आणि ठोके मोजा

तुमच्या आजूबाजूला एखाद्याला पॅनीक अटॅक येत असल्यास, त्यांना बसायला सांगा आणि दीर्घ श्वास घेत आणि हळू हळू हृदयाचे ठोके मोजा. जर तुम्ही एकटे असाल आणि तुम्हाला पॅनिक अटॅक येत असेल तर तुम्हाला हा उपाय स्वतःच करून पाहावा लागेल.

बर्फ किंवा थंड पाण्याने स्वतःला ओले करा

पॅनीक अटॅकमध्येही थंड पाणी फार फायदेशीर ठरते. पॅनिक अटॅक आल्यास चेहरा थंड पाण्याने धुवावा. जर ते बर्फाचे पाणी असेल तर आणखी चांगले. चेहऱ्यासह मान पुसून टाका. आपल्या डोक्यावर एक थंड टॉवेल ठेवा. असे केल्यास तुम्हाला बऱ्यापैकी आराम मिळेल.

फिजीकल अॅक्टिव्हिटी करा

जर तुम्हाला याआधी कधीही पॅनीक अटॅक आला असेल, तर ही परिस्थिती टाळण्यासाठी शारीरिक व्यायामाला तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनवा. शारीरिक हालचाली केल्याने एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे मनःस्थिती सुधारते आणि मन शांत होते. तणाव आणि चिंता कमी करून, पॅनीक अटॅकचा धोका देखील कमी होतो.

जर तुम्ही अशा वातावरणात असाल जिथे तुमच्या आजूबाजूच्या काही गोष्टी तुमची भीती वाढवत असतील किंवा तुम्हाला चिंता वाटत असेल तर काही वेळ डोळे बंद करून बसा. असे केल्याने, तुम्हाला बरे वाटू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आशा भोसलेंची कशी आहे प्रकृती? तब्येतीबाबत पंतप्रधान मोदींची पोस्ट, नातीने दिली हेल्थ अपडेट, म्हणाली, 'चेस्ट इन्फेक्शनमुळे...'

Breaking News Live Update: अलिबागच्या नागाव बिचवर रोबो रक्षक तैनात

IPL 2026: लखनौचा चौधरी केंद्रस्थानी; गुजरात टायटन्स संघाविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Nanded News: माहूर तालुक्यातील अवैध वाळू उत्खननासाठी पैनगंगा ‘आंदण’; ट्रेझर बोटींसह जेसीबी व पोकलँड मशीनचा वापर, पर्यावरणाला धोका

Asia Badminton Championship: भारताच्या आयुष शेट्टीची अंतिम फेरीत धडक; वर्ल्ड चॅम्पियनला हरवून आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये

SCROLL FOR NEXT