Skin Care Tips for Pimples  esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : झोपताना 'या' चुकीच्या सवयी तुमचा चेहरा करू शकतात खराब

कोणत्याही व्यक्तीला विचारलं तर तिची पहिली इच्छा असते पिंपल्स नसलेला चेहरा.

सकाळ डिजिटल टीम

Skin Care Tips for Pimples : कोणत्याही व्यक्तीला विचारलं तर तिची पहिली इच्छा असते पिंपल्स नसलेला चेहरा. कोणालाही आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स नको असतात, कारण त्यानंतर चेहरा खूप वाईट दिसू लागतो. यासाठी खरंतर अनेक लोकं खूप उपाय करतात पण कोणत्या ना कोणत्या कारणाने चेहऱ्यावर पिंपल्स येतातच.

पण तुम्हाला हे माहिती आहे का की आपल्या झोपेच्या पद्धतीमुळे सुद्धा आपल्याला पिंपल्सचा त्रास होवू शकतो. झोपेच्यावेळेस केलेल्या काही चुकांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या वाढू लागते. बघूयात या चुका आणि त्यावरचे उपाय...

१. पोटावर झोपण्याची सवय :

पोटावर झोपण्याची सवय चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचं एक खूप मोठं कारण आहे. अशा अवस्थेत झोपल्याने आपली त्वचा थेट उशीच्या कव्हरच्या संपर्कात येते. यामुळे त्वचा आणि उशीमध्ये घर्षण होऊन पिंपल्स आणि त्वचेच्या इतर समस्या वाढू शकतात.

२. तेलकट केस :

केसांच्या निरोगी आरोग्यासाठी त्यांना नियमित तेल लावणे चांगले असते. पण याचा आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होतो. विशेषतः तेलकट त्वचा असणाऱ्यांनी रात्री केसांना तेल लावून झोपू नये.

३. रात्री झोपताना केसांना तेल लावणे :

रात्री झोपताना केसांना तेल लावल्यास हे तेल चेहऱ्यावर उतरते आणि जास्त सीबममुळे त्वचेवर पिंपल्स येतात. केसांना पोषण देण्यासाठी केस धुण्याच्या दोन तास आधी कोमट तेलाने केसांना मसाज करावा.

४. योग्य क्लीनजर :

त्वचेच्या स्वच्छतेसाठी योग्य क्लीनजर योग्य पद्धतीने वापरणे अतिशय गरजेचं आहे. याच प्रमाणे चेहरा धुतल्यानंतर चेहरा पुसण्यासाठी वापरायचा टॉवेलही स्वच्छ असणे गरजेचं आहे.

५. मेकअप न काढता झोपणे :

एखाद्या कार्यक्रमातून रात्री उशिरा घरी आल्यावर बहुतेक मुली चेहऱ्यावरील मेकअप न काढता तशाच झोपून जातात. पण मेकअप चेहऱ्यावर तसंच ठेवून झोपणे त्वचेसाठी हानिकारक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT