yoga for skin esakal
लाइफस्टाइल

Yoga For Skin: हेल्दी आणि ग्लोईंग स्किन हवीय? मग ‘या’ सोप्या योगासनांचा करा सराव

मन आणि शरीर रिलॅक्स ठेवण्यासाठी योगा फायदेशीर आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या शरिराला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या गोष्टी करतो. विविध प्रकारचे व्यायाम, झुंबा, कार्डिओ, जिम, रनिंग, जॉगिंग आणि योगा असे अनेक व्यायाम करतो. मात्र, यामध्ये सातत्य ठेवण्यात काही जणांनाच यश येतं.

योगा सगळ्यावर रामबाण उपाय आहे. मन आणि शरीर रिलॅक्स ठेवण्यासाठी योगा फायदेशीर आहे. योगामुळे शरिराची लवचिकता देखील वाढते. मात्र, योगा त्वचेसाठी देखील तितकाचं लाभदायी आहे, हे अनेकांना माहित ही नसेल. योगामुळे आपली त्वचा हेल्दी आणि ग्लोईंग राहण्यास मदत मिळते.

त्वचा निस्तेज होणे, कोरडी पडणे, त्वचा सैल होणे अशा कितीतरी समस्यांवर योगासने करणे हा चांगला उपाय आहे. चला तर मग, आज आपण अशाच 2 सोप्या योगासनांबद्दल जाणून घेऊयात.

वीरभद्रासन

वीरभद्रासन हे योगासन फक्त त्वचेसाठी नाही तर, संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय उत्तम असे आसन आहे. हे योगासन पाठीसाठी आणि पोटासाठी देखील एकदम सुंदर आहे. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ रेषेत उभे रहा.

त्यानंतर, ताडासनात या आणि पायामध्ये थोडे अंतर ठेवा. आता दोन्ही हात वर करा. त्यानंतर, दोन्ही हातांचे तळवे डोक्याच्या वर एकत्रितपणे घ्या. उजव्या पायाची बोटे ९० अशांमध्ये वळवा.

त्यानंतर, डाव्या पायाची बोटे फिरवा. या स्थितीमध्ये दोन्ही पाय समांतर आणि स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. आता उजव्या पायाचा गुडघा वाकवून तो ९० अशांमध्ये ठेवा. परंतु, डावा पाय सरळ ठेवा आणि डोके मागे न्यायचा प्रयत्न करा आणि वर बघा.

काही सेकंद या स्थितीत रहा आता हे योगासन पुन्हा दुसऱ्या पायाने करा. या योगासनामुळे तुमच्या चेहऱ्याला ही ताण बसतो. तुम्ही नियमितपणे हे योगासन केल्यास तुमची त्वचा हेल्दी आणि ग्लोईंग राहण्यास मदत होईल.

वृक्षासन

वृक्षासन हे सर्वात सोप्या आणि फायदेशीर योगासनांपैकी एक असलेले आसन आहे. झाडांच्या स्थितीची प्रेरणा घेऊन या योगासनाची रचना करण्यात आल्याचे म्हटले जाते. या योगासनाचा नियमितपणे सराव केल्यास शरीर संतुलित राहते.

हे योगासन करण्यासाठी सरळ रेषेत उभे रहा. आता उजवा पाय तुमच्या डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही हात सरळ वरती नेऊन नमस्काराच्या स्थितीमध्ये ठेवा. सरळ पुढे पहा. पाठीचा कणा ताठ ठेवा. या स्थितीमध्ये काही सेकंद रहा आणि नंतर शरीर हळूहळू सैल ठेवा आणि आराम करा. हीच स्टेप पुन्हा दुसऱ्या बाजूने करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT