Weight Loss journey  esakal
लाइफस्टाइल

Weight Loss journey : वजन कमी करायचे आहे? मग, आहारात समाविष्ट करा ‘हे’ झीरो कॅलरीज फूड्स

वजन कमी करण्यासाठी अनेक जण व्यायाम आणि संतुलित आहाराची मदत घेतात. मात्र, अनेकदा लोक या अन्नपदार्थांमध्ये असलेले पोषण आणि कॅलरीजबद्दल गोंधळून जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Weight Loss journey : वजन कमी करण्यासाठी अनेक जण व्यायाम आणि संतुलित आहाराची मदत घेतात. मात्र, अनेकदा लोक या अन्नपदार्थांमध्ये असलेले पोषण आणि कॅलरीजबद्दल गोंधळून जातात. कोणत्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करावा आणि कोणत्या करू नये? याबाबत लोकांचा संभ्रम दिसून येतो.

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी काही जण अनेक प्रकारचे डाएट फॉलो करू लागतात. मात्र, तरी ही काय खावे आणि काय खाऊ नये हे ठरवणे काहींसाठी अवघड होऊन बसते. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला झीरो कॅलरी फूड्सबद्दल सांगणार आहोत. या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्याने तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास आणखी सुलभ होईल.

पॉपकॉर्न

पॉपकॉर्न हा हेल्दी स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय आहे. पॉपकॉर्नचे सेवन केल्याने शरीरातील लोह, मॅग्नेशिअम आणि झिंकची कमतरता पूर्ण होते. पॉपकॉर्नमध्ये झीरे कॅलरीज आढळून येतात. त्यामुळे, पॉपकॉर्नचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक देखील लागत नाही.

विशेष म्हणजे पॉपकॉर्नमध्ये फायबर्स देखील आढळून येतात, त्यामुळे, शरीरातील ऊर्जेची पातळी कायम राहण्यास मदत होते आणि वजन ही कमी होते.

किवी

वजन कमी करण्यासाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी किवी हे फळ अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे, तुमच्या आहारात किवीचा जरूर समावेश करा. किवीचा समावेश केल्याने शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी बर्न होण्यास मदत होऊ शकते.

यासाठी तुम्ही किवी स्मूदी, किवीचे सॅलेड किंवा किवी खाऊ शकता. किवीमध्ये आढळणाऱ्या फायबर्समुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही आणि पोट भरलेले राहते. किवीमध्ये झिरो कॅलरीज आढळून येतात. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी किवी हे फळ अतिशय फायदेशीर आहे.

मूळा

हिवाळ्यात मूळा ही फळभाजी बाजारात मोठ्या प्रमाणात मिळते. मूळ्याचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन, पोटॅशिअम आणि फॉलेटची कमतरता भरून निघण्यास मदत होते.

शिवाय, मूळा खाल्ल्याने शरीरातील कॅलरीज देखील वाढत नाहीत. मूळ्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आढळून येते, त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी मूळा अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे, तुमच्या आहारात मुळ्याचा जरूर समावेश करा आणि वजन कमी करण्याचा प्रवास आणखी सोपा करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT