Thief Arrested After Mountain of 500 Stolen Cycles in His Backyard Spotted on Google Earth snk94
Thief Arrested After Mountain of 500 Stolen Cycles in His Backyard Spotted on Google Earth snk94 
लाइफस्टाइल

Google Earthने शोधल्या गार्डनमध्ये लपवलेल्या चोरीच्या 500 सायकली!

सकाळ डिजिटल टीम

यूकेमध्ये एक व्यक्तीने इतक्या सायकली चोरल्या होत्या की त्याचे घरामागील गार्डन पूर्ण भरले होते. पोलिसने बऱ्याच काळापासून या चोराच्या शोधामध्ये होते. पण Googleमुळे हा चोर सापडला आहे. होय! Google Earthच्या मदतीने त्याच्या घराची सर्व महिती पोलिसांना समजली आणि चोरी पकडली गेली.

पोलिसांना घराच्या बॅकयार्डमध्ये Google Earthवर सायकलीच सायकली आढळल्या. ऑक्सफर्डमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीच्या घरातून पोलिसांनी ५०० सायकली जप्त केल्या आहेत.

Google Earthच्या मदतीने सापडला चोर

पोलिसने जेव्हा ५४ वर्षाच्या व्यक्तीला अटक केली, तेव्हा त्याच्या घराचा बॅकयार्ड सायकलींनी भरलेला पाहून ते हैरान झाले होते.

थेम्स वेली यांनी पोलिसांनी यावेळी स्टेटेमेट जाहीर करून माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की या व्यक्तीच्या विरोधात आधीच तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र चौकशी केली असता हा सगळा प्रकार उघडकीस आला.

शेजारी म्हणाले....

या व्यक्तीच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, त्याच्या घरामध्ये कित्येक सायकली दिसत होत्या. त्याचा घराच्या बॅकयार्डला सायकलींनी पूर्ण भरलेला आहे. कित्येक वर्षांपासून व्यक्ती घराच्या मागे सायकली उभ्या असल्याचे दिसते. चार वर्षांपूर्वी त्यांनी या व्यक्तीच्या या वर्तनाविरोधात तक्रार करणे सुरू झाले होते.

चोरटा म्हणे, ''या सायकली आफ्रिकेतील लोकांना पाठवल्या जाणार आहेत''

ते पुढे म्हणाले की, ''ज्यावेळी या व्यक्तीशी सायकलीबद्दल बोलायचे, त्या वेळी तो म्हणत असे की, ''आफ्रिकेतील गरजू मुलांसाठी या सायकली गोळा करत असून लवकरच त्या तिथे पाठवू. तो या सायकली कधी दिवसा तर कधी रात्री व्हॅनमध्ये आणत असे.''

सध्या पोलीस या सायकली असलेल्या लोकांचा शोध घेत आहेत जेणेकरून त्यांच्या सायकली त्यांना परत करता येतील.

पोलिसांनी म्हणाले

थेम्स पोलिसांचे प्रवक्त्यांनी सांगितले की, इतक्या सायकली नक्कीच चोरी केल्ला असणार, आता या सायकली त्या प्रॉपर्टीमधून रिक्वर केल्या आहे. मात्र ऑफिसर सायकलींच्या मालकांचा शोध घेत आहे, जेणेकरून त्यांच्या सायकली त्यांना परत करता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT