yuganda women  google
लाइफस्टाइल

४३ वर्षांची महिला बनली ४४ मुलांची जन्मदात्री; पतीने घाबरून सोडलं घर

आतापर्यंत मरियमने एकदाच एकट्या बाळाला जन्म दिला आहे. याशिवाय चारवेळा जुळे, पाचवेळा तीळे आणि ५ बाळांना ४ वेळा जन्म दिला आहे.

नमिता धुरी

मुंबई : वाढती महागाई आणि वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा विचार करता एक मूल वाढवणेही आजकालच्या पालकांना कठीण जात आहे; मात्र पूर्व आफ्रिकेतल्या युगांडामध्ये अशी एक महिला आहे जिने वयाच्या ४०व्या वर्षापर्यंत ४४ मुलांना जन्म दिला होता. आता ही महिला ४३ वर्षांची आहे.

मरियम १२ वर्षांची असताना त्यांच्या आईवडिलांना लग्नाच्या नावाखाली तिला विकले. १३ वर्षांची असताना तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. आतापर्यंत मरियमने एकदाच एकट्या बाळाला जन्म दिला आहे. याशिवाय चारवेळा जुळे, पाचवेळा तीळे आणि ५ बाळांना ४ वेळा जन्म दिला आहे. यापैकी ६ मुलांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिवंत असलेल्या मुलांपैकी २० मुलगे आणि १८ मुली आहेत.

मरियमला डॉक्टरांनी सांगितले की, तिचे अंडाशय सामान्य स्थितीपेक्षा मोठे आहे. त्यामुळे Hyperovulation स्थिती निर्माण होते. ही स्थिती अनुवांशिक असून यात अधिक प्रमाणात मुलांना जन्म देण्याची शक्यता वाढते. अशा स्थितीत कुटुंब नियोजनाचे कोणतेही तंत्र उपयोगी ठरत नाहीत. Hyperovulationवर उपाय अस्तित्त्वात आहे; मात्र त्याची सुविधा आफ्रिकेच्या ग्रामीण भागात पोहोचलेली नाही.

२०१६ साली मरियमचा नवरा घरातील सगळे पैसे घेऊन पसार झाला. त्या वर्षी तिने आपल्या सर्वात लहान मुलाला जन्म दिला. मरियम नॉर्थ कंपालापासून ३१ मैल दूर असलेल्या शेताने वेढलेल्या घरात राहाते. मुलांचे संगोपन करण्यासाठी मरियमने आतापर्यंत विविध प्रकारची कामे केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT