father's day google
लाइफस्टाइल

या सेलिब्रिटी बाबांनी पत्करले आहे एकल पालकत्व

भारतात असे मानले जाते की फक्त आईच मुलांना वाढवू शकते. मात्र, आता ही प्रतिमा आणि धारणा बदलत असून वडीलही मुलांचे चांगले संगोपन करू शकतात, हे समोर येत आहे.

नमिता धुरी

मुंबई : मुलांच्या संगोपनाचा विषय निघतो तेव्हा आईची प्रतिमा प्रथम समोर येते. आईशिवाय मुलांचे संगोपन होऊ शकत नाही, असे प्रत्येकाला वाटते. मुलं वडिलांशिवाय मोठी होतात, आईशिवाय होत नाहीत, हा डायलॉग भारतात खूप प्रसिद्ध आहे.

मुलांचे संगोपन करणे हे आईचे काम आहे असे सामान्यतः मानले जाते. तुम्हीही लहानपणापासूनच हे घडताना पाहात आला आहात की मुलं ही आईची पहिली गरज आणि वडील दुसऱ्या क्रमांकावर येतात. भारतात असे मानले जाते की फक्त आईच मुलांना वाढवू शकते. मात्र, आता ही प्रतिमा आणि धारणा बदलत असून वडीलही मुलांचे चांगले संगोपन करू शकतात, हे समोर येत आहे.

फादर्स डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटी फादर्सबद्दल सांगत आहोत जे एकट्याने मुलांना वाढवतात. एकल पालकत्व हे सोपे काम नाही आणि जर तुम्ही सेलिब्रिटी पालक असाल तर तुमचे काम आणखी कठीण होईल. चला तर मग जाणून घेऊया त्या सेलिब्रिटी वडिलांबद्दल जे आपल्या मुलांचे संगोपन एकटेच करत आहेत.

रिकी मार्टीन

ग्रॅमी विजेते रिकी मार्टिन हे दोन जुळ्या मुलांचे वडील आहेत. २००८ मध्ये सरोगसीच्या मदतीने रिकी वडील झाला. या गायकाने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, आपल्या लैंगिकतेमुळे तो कधीच पालक बनू शकणार नाही या भीतीमध्ये तो अनेक वर्षांपासून जगत होता.

करण जोहर

करण जोहरने फिल्म इंडस्ट्रीत उत्तम काम केले आहे आणि वैयक्तिक आयुष्यातही तो चांगला पिता आहे. २०१७ मध्ये सरोगसीच्या मदतीने करण दोन जुळ्या मुलांचा बाप झाला. करणने अनेकदा सांगितले आहे की, वडील झाल्यानंतर त्याचे आयुष्य खूप बदलले आहे.

टॉम क्रूज

टॉम क्रूझ तीन मुलांचा बाप आहे. टॉमला एक मुलगी असून त्याने दोन मुले दत्तक घेतली आहेत. टॉम म्हणतो की त्याला आयुष्यभर वडीलच राहायचे आहे आणि वाटले की त्याची मुले कोणत्याही गोष्टीसाठी त्याच्यावर अवलंबून राहू शकतात. टॉम म्हणतो की मला वाटत नाही की जास्त प्रेम मुलांना बिघडवते.

तुषार कपूर

तुषार कपूर २०१६ मध्ये सरोगसीच्या मदतीने सिंगल फादर झाला. तुषार सोशल मीडियावर आपल्या मुलांसोबत व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत असतो. तुषारने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला नेहमीच वडील व्हायचे होते.

ब्रॅड पिट

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता ब्रॅड पिट हा ६ मुलांचा बाप आहे. पिट आणि त्याची पूर्वीची पत्नी एंजेलिनो जोली यांनी २००५ मध्ये डेटिंग करण्यास सुरुवात केली आणि तीन वर्षांनंतर, पिटने अँजेलिनाचा दत्तक मुलगा मॅडॉक्सला दत्तक घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा जुना फोटो काँग्रेस नेत्याने केला व्हायरल; शपथविधी सोहळा अन् जमिनीवर बसलेले मोदी

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकच उमेदवार ३ पक्षांकडून करत आहे अर्ज!

Latest Marathi News Live Update: राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी वन आणि खाण विभागाची आढावा बैठक घेतली

Team India U19: आयसीसी U-19 वर्ल्डकप आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; कर्णधारपदाची धुरा कुणाकडे?

Pune Political Breaking : बराटे, शिवरकर यांची भाजप मध्ये एन्ट्री; वानवडीमध्ये राजकीय ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT