Work Place Bad Habbits
Work Place Bad Habbits esakal
लाइफस्टाइल

Work Place Bad Habbits: वर्क प्लेसवरील 'या' 5 वाईट सवयी करतील तुमचं वाटोळं! ना इंक्रिमेंट ना प्रमोशन..

साक्षी राऊत

Bad Habbits: कुठल्याही वर्क प्लेसवर तुमच्या स्किल्ससोबत तुमची वागणूकही महत्वाची ठरते. तेव्हा तुमची वागणूक कशी आहे त्यावर तुमचं प्रमोशन आणि इंक्रिमेंट ठरू शकते. मात्र तुमच्या काही सवयी तुमच्या कामात आणि त्याचबरोबर करियर सक्सेस मध्येही अडथळे आणू शकतात. अनेकदा तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीवदेखील नसते.

तुम्हाला तुमच्या वर्कप्लेसवर प्रमोशन किंवा इंक्रिमेंट मिळवायची असेल तर तुमची वागणूक आणि तुमच्या वाईट सवयी बदलाव्या लागेल. त्या वाईट सवयी कोणत्या ते आपण जाणून घेऊया.

कामाची सुरूवात न करणे - करियर एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की, जे कर्मचारी स्वत:वरून कामाची सुरूवात करत नाहीत. त्यांची नवं काही शिकण्याची उत्सुकता नसते ते बॉसला अजिबात आवडत नाही. तेव्ही तुमची ही सवय प्रमोशनच्या वेळी तुमची फजिती करू शकते. जे लोक स्वत:च्या आयडिया बॉसकडे घेऊन जातात काहीतरी नवं करण्याची उत्सुकता ठेवतात अशांनाच प्रमोशनसाठी प्राधान्य दिल्या जातं.

ऑफिसमध्ये अॅक्टिव्ह नसणे - नुसतं ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमचं वेगळं व्यक्तीमत्व पटवून देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ऑफिसच्या मिटींग आणि मध्ये आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे लागेल. याचा थेट प्रभाव तुमच्या इंक्रिमेंटवर होईल.

कायम उशीरा येणे आणि लवकर जाणे

काही लोकांना ऑफिसमध्ये उशीरा येऊन लवकर घरी जायला आवडतं. जर तुम्ही ऑफिसमध्ये तुमची हीच सवय कायम ठेवली तर तुमचं प्रमोशन आणि इंक्रिमेंट दोन्ही कठीण ठरेल.

प्रत्येक गोष्टीची तक्रार करणे

ऑफिसमध्ये बरेच लोक असे असतात जे लहान सहान गोष्टींची तक्रार करतात. तुमच्यातही ही सवय असेल तर लगेच बदला. लहान सहान गोष्टींवर तक्रार करणारे लोक कोणालाही आवडणार नाही. तुमची ही सवय तुमच्यातील नकारात्मकता दर्शवत असते.

दुसऱ्यांच्या चुका काढणे - जर तुमच्यात दुसऱ्यांच्या कमतरता आणि चुका दाखवून देण्याची सवय असेल तर ती लगेच बदलायला हवी. याउलट तुम्ही चुकलेल्या व्यक्तीस योग्य ती शिकवण द्यायला हवी. असे न केल्यास तुम्हाला कधीही टीम प्लेयर समजल्या जाणार नाही. कुठल्याही वर्क प्लेसवर यशस्वी राहाण्यासाठी टीम प्लेयर असणं फार महत्वाचं मानल्या जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT