Pudina face mask sakal
लाइफस्टाइल

Pudina For Face: तुमच्या त्वचेसाठी पुदिन्याचा असा होऊ शकतो उपयोग, जाणून घ्या

पुदिन्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात

Aishwarya Musale

पुदीनेचा थंड प्रभाव असतो. त्याचा वापर शरीराला थंड ठेवण्याचे काम करतो. तुम्ही अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये ते समाविष्ट करू शकता. पुदिन्याचा वापर लस्सी, ताक, चटणी अशा अनेक गोष्टींमध्ये करता येतो. पुदिन्याच्या पानांमध्ये सॅलिसिलिक ऍसिड असते. ते तुमची त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवते.

अनेक लोक मुरुमांमुळे त्रस्त राहतात. अशा परिस्थितीत पुदिन्याचा वापर त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. पुदिन्यामुळे तुमची त्वचाही मुलायम राहते. पिंपल्स आल्यावर तुम्ही पुदिन्याच्या पानांचा वापर कोणत्या प्रकारे करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.

संपूर्ण पुदीना वापरा

त्वचेसाठी तुम्ही फक्त पुदिन्याची पाने वापरू शकता. पुदिन्याची पाने धुवून पेस्ट तयार करा. पुदिन्याची पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर कोरडे होईपर्यंत ठेवा. यानंतर ही पेस्ट काढून टाका. तुम्ही पुदिन्याची पाने आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरू शकता.

पुदीना आणि तुळस

मुरुमांचा सामना करण्यासाठी, पुदिन्याची पाने आणि तुळशीची पाने वापरा. पुदिना आणि तुळशीच्या पानांमध्ये पाणी घालून पेस्ट तयार करा. पुदिना आणि तुळशीची पेस्ट चेहऱ्यावर वीस मिनिटे राहू द्या. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

पुदीना आणि लिंबाचा रस

पुदिन्याच्या पानांमध्ये पाणी आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. वीस मिनिटांनंतर, साध्या पाण्याने त्वचा स्वच्छ करा. मुरुमांच्या समस्येचा सामना करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

पुदिन्याची पाने आणि मध

पुदिन्याच्या पानात पाणी घालून पेस्ट तयार करा. त्यात मध घालून हा पॅक चेहरा आणि मानेवर लावा. 20 ते 25 मिनिटे ठेवल्यानंतर हा पॅक स्वच्छ पाण्याने काढून टाका.

पुदिना आणि ग्रीन टी

एक कप ग्रीन टी तयार करा. ते थंड करा. आता पुदिन्याच्या पानात ग्रीन टी मिक्स करून पेस्ट बनवा. 20 मिनिटांनंतर पुदीना आणि ग्रीन टीची पेस्ट त्वचेतून काढून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT