लाइफस्टाइल

'या' गोष्टींमुळे नात्यातील गमावलेला विश्वास पुन्हा मिळवा

जोडीदारासोबत सतत वाद होतात?

शर्वरी जोशी

सुखी जीवनाचा मूलमंत्र काय? असा प्रश्न विचारला तर त्याची अनेक उत्तर मिळतील. कारण, प्रत्येकाच्या सुखी जीवनाचं अर्थ हा वेगवेगळा असतो. परंतु, कोणतंही नातं दीर्घकाळापर्यंत टिकून ठेवायचं असेल तर त्या नात्यात विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. या नात्यात प्रेमासोबतच विश्वास, आदर, स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजेत. मात्र, अनेकदा नात्यात स्वातंत्र्य, प्रेम असल्यावरही ते नातं फार काळ टिकत नाही. म्हणून नात्यातील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत हे जाणून घेऊयात. (this-is-how-you-build-trust-in-your-relationship)

१. तुमच्या एकत्र असण्यामागचा नीट अर्थ समजून घ्या. तुमचं नात योग्य दिशेलाच जातंय ना याचा विचार करा. नात्याला एक आकार द्या आणि त्याच चौकटीभोवती तुमचं आयुष्य फिरत राहणार असल्यामुळे हे नातं कायम टिकवून ठेवा.

२. कोणतंही नातं टिकवून ठेवायचं असेल तर त्यात विश्वास आणि एकमेकांप्रतीचा असलेला आदर कायम राखला पाहिजे. जर नात्यात तुम्ही एकमेकांना आदर, मान देत असाल तर ते नातं शेवटपर्यंत टिकतं. तसंच जितका नात्यात आदर असतो तितकंच प्रेम वाढत जातं.

३. चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणारं प्रेम आणि खऱ्या आयुष्यातील प्रेम यांच्यात जमीन-आस्मानाचा फरक असतो. जे चित्रपटात घडतं तेच खऱ्या आयुष्यात घडेल असं नाही. त्यामुळे जोडीदाराकडून कोणत्याही अवाजवी अपेक्षा ठेऊ नका. नात्यात प्रेम, सन्मान, विश्वास,स्वातंत्र्य टिकून राहिल याकडे लक्ष द्या.

४. सुख-दु:खात कुटुंबीय एकमेकांची साथ देतात हे कितीही खरं असलं तरीदेखील नात्यात चढउतार सुरु असतील तर त्यात कुटुंबाला मध्ये घेऊ नका. तसंच जर एकमेकांमधील नातं अधिक दृढ करायचं असेल तर एकमेकांना वेळ द्या.

५. तुमच्या मनात ज्या काही गोष्टी असतील त्या जोडीदारासोबत शेअर करा. तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट त्याला सांगा. जर तुम्ही जोडीदाराशी बोलतांना कायम घाबरत राहिलात तर भाविष्यात याच गोष्टी अडचणीच्या ठरु शकतात.

६. जरी तुम्ही एकमेकांवर प्रेम करत असाल तरीदेखील आपल्या जोडीदाराला त्याची पर्सनल स्पेस देणं अत्यंत गरजेचं आहे. जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करणं, उगाच सल्ले देणं टाळावं. तसंच एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा त्यामुळे तुमच्यातील विश्वास दृढ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT