Tight Jeans Effect esakal
लाइफस्टाइल

Tight Jeans घालायला आवडते! 5 परिणाम वाचा

काहीवेळा तर जीन्स महिनोंमहिने न धुता वापरली जाते

सकाळ डिजिटल टीम

Skinny jeans side effects: जीन्स वापरण्यात काही नाविन्यता राहिलेली नाही. मात्र या जीन्सचे नवनवीन ट्रेन्ड्स (Fashion Trends) येत असतात. आजकाल अनेक मुला-मुलींना घट्ट जीन्स घालायला आवडते. काहीवेळा तर जीन्स महिनोंमहिने न धुता वापरली जाते. पण असे करणे शरीरासाठी चांगले नसते. घरच्यांनी याबाबात जाणीव करून दिली की मुलं जीन्स धुवायला टाकतात. पण जीन्स खूप वेळ वापरली तर त्याचा आपल्या शरीरावर (Body) वाईट परिणाम होऊ शकतो. घट्ट जीन्समुळे तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ घट्ट जीन्स घातल्याने वैरिकास व्हेन्सपासून रक्ताच्या गुठळ्या होण्यापर्यंत अनेक गंभीर आजार होऊ शकतो. विशेषतः महिलांच्या (Womens) आरोग्यावर (Health)परिणाम होतो, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

या होतात समस्या

स्कीनी पॅंट सिंड्रोम- तुमची जिन्स कितीही आरामदायक असली तरीही सैल पॅंट घालणे योग्य ठरते. घरी आल्यावर पॅंट काढून टाकणे चांगले. घट्ट जीन्स जास्त काळ घातल्याने तुमच्या पायांच्या स्नायूंना आणि नसांना इजा होऊ शकते. यामुळे तुमच्या मांडीच्या पुढच्या भागात सुन्नपणा, वेदना आणि मुंग्या येऊ शकतात. या स्थितीला स्किनी पँट सिंड्रोम असेही म्हणतात.

couple

रक्ताभिसरणावर परिणाम- दिवसभर घट्ट जिन्स घातल्याने तुमची कंबर आणि पायाचे रक्ताभिसरण कमी होऊ शकते. तसेच, तुमच्या रक्तवाहिन्यांना हृदय आणि इतर अवयवांना रक्त पंप करणे कठीण होऊ शकते. यामुळे तुमचे अवयव नीट काम करू शकत नाहीत.

प्रजननावर परिणाम- दररोज घट्ट जीन्स घातल्याने संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. त्यापैकी एक व्हल्वोडायनिया हा संसर्ग. यामुळे महिलांच्या खाजगी भागात वेदना होतात. तसेच त्याच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. संशोधकांना असे आढळून आले आहे की ज्या स्त्रिया आठवड्यातून 4 किंवा अधिक वेळा घट्ट जीन्स घालतात त्यांना व्होल्वोडायनिया होण्याची शक्यता दुप्पट असते.

tight jeans

ब्लड क्लॉट- घट्ट जीन्स घातल्याने शरीराच्या खालच्या भागात रक्ताभिसरण खराब होऊ शकते. त्यामुळे समस्या निर्माण होतात. रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. घट्ट जिन्समुळे नसांवर सतत दाब पडतो. त्यामुळे कंबर आणि मांड्यांनाही वेदना होतात. असे अनेकदा झाल्यास पायांना मुंग्या येतात. जळजळ वाढते तसेच अस्वस्थता येते.

पुरूषांना UTI चा धोका - घट्ट जीन्स घातल्याने पुरूषांनाही त्रास होतो. त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. तसेच इतर शारीरिक समस्या निर्माण होतात. यामुळे त्यांना UTI होतो. जीन्स जास्त वेळ घातल्याने पुरुषांमध्ये कॅन्सरचा धोका वाढतो आणि प्रायव्हेट पार्ट खराब होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल; मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबतचे 'ते' वक्तव्य भोवले

माेठी बातमी! 'श्रीगोंदेत खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण'; अडीच कोटीची मागणी करत ३० लाख स्वाकारले, जिल्ह्यात खळबळ

IND vs PAK, Asia Cup: पाकिस्तानने टॉस जिंकला, पण भारताच्या मनासारखा निर्णय घेतला; पाहा प्लेइंग - ११

Accident News: भीषण अपघात! हरिद्वारहून परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात, ७ जणांचा मृत्यू

Leopard Terror : 'नागराळच्या शिवारात बिबट्या आढळल्याने शेतकऱ्याचा जीव टांगणीला'; मुक्तसंचारामुळे सीमेवरील गावात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT