Study Habit esakal
लाइफस्टाइल

Study Habit : तुमचीही मुलं अभ्यासाचा कंटाळा करताय? सेल्फ स्टडीची सवय लावण्यासाठी 'या' खास टिप्स

तुम्हालाही तुमच्या मुलांच्या बाबतीत अशाच तक्रारी असतील तर तुम्ही या काही खास टिप्स ट्राय करून बघा

साक्षी राऊत

Study Habit : प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांचं उज्वल भविष्य बघायचं असतं. त्यामुळे मुलांचं अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याच्या दिशेने पालकांचा विशेष कल असतो. मात्र काही मुले अभ्यासाचा फारच कंटाळा करतात. त्यांची मुले स्वत:वरून कधीच अभ्यास करत नाही अशी त्यांची तक्रार असते. मुले मन लावून अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यासाच्या वेळी चिडचिड करतात. मुलांच्या या सवयी पुढे पालकांसाठी मोठी समस्या निर्माण करतात. तुम्हालाही तुमच्या मुलांच्या बाबतीत अशाच तक्रारी असतील तर तुम्ही या काही खास टिप्स ट्राय करून बघा.

मुलांचे लक्ष अभ्यासात लागावं यासाठी या काही खास टिप्स

१) मुलांचं कौतुक करा

मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या यशाबाबत त्यांचं कौतुक करा. तसेच मुलांना अभ्यासासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहित करा. त्यांचं लक्ष अभ्यासाकडे आकर्षित करा. मुलांकडून काही चुकी झाल्यास त्यांना रागवण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगा. मुलांना वेळ द्या आणि त्यांच्या जवळ बसून त्यांच्या होमवर्कमध्ये त्यांना मदत करा.

२) हेल्दी डाएट

मुलांच्या आहाराचा प्रभाव थेट त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर पडतो. तेव्हा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी त्यांना संतुलित आहार देणं फार महत्वाचं आहे. अशात जंक फूडऐवजी मुलांना हेल्दी फूड खायला द्या.

मुलांच्या झोपेची काळजी घ्या

झोप न झाल्यास मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. अभ्यासाच्या वेळी त्यांना झोप येते. मुलांची झोप नीट झाल्यास त्यांची एकाग्रता आणि अभ्यास दोघांचाही विकास होतो. (Study)

एक्सरसाइज

डब्लूएचओनुसार, एक्सरसाइझ केल्याने मुलांच्या अभ्यासात सकारात्मक परिणाम दिसून येतो. व्यायाम केल्याने एकाग्रता वाढते. ज्यामुळे मुलांना अभ्यास दीर्घकाळ लक्षात राहतो. (Education)

खोलीच्या वेंटिलेशनकडे लक्ष द्या

मुले ज्या खोलीत अभ्यास करताय तिथे हवा खेळती असावी. जेणेकरून मुलांचे अभ्यासात मन लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Women Cricketers Salary: नववर्षाआधी ‘BCCI’कडून महिला खेळाडूंना मोठी भेट; वेतनात केली दुप्पट वाढ

BJP Candidate List : भाजप उमेदवारांच्या यादीला शुक्रवारचा मुहूर्त; शिवसेनेसोबत जागावाटप अजूनही अनिश्चित!

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

SCROLL FOR NEXT