hair esakal
लाइफस्टाइल

डोक्यात सतत खाज येतेय? हे ट्राय करा

सकाळ डिजिटल टीम

डोक्याला खाज सुटणे ही तशी सामान्य समस्या आहे. या समस्येपासून कित्येक जण त्रस्त असताना आपण पाहतो. न घेतलेल्या काळजीमुळे तसेच अनेक कारणांमुळे केसांना तसेच केसांखाली असलेल्या त्वचेला खाज येते. केसांची मुळे कोरडी राहील्याने खाज तर येतेच त्याचबरोबर कोंड्याची समस्याही उद्भवते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण कोंड्याची समस्या वाढल्यास मायक्रोबियल इंफेक्शन होऊ शकते. म्हणून स्काल्प कोरडे राहू देऊ नका.

टी ट्री ऑईल

टी ट्री ऑईलमध्ये टरपीन्स नावाचे घटक असते. त्यामुळे अॅंटी बॅक्टेरिअल, अॅंटी फंगल गुण असतात. त्यामुळे केसातील खाजेपासून सुटका मिळते. २ चमचे टी ट्री ऑईलमध्ये चमचाभर ऑलिव्ह ऑईल घालून ते मिश्रण कापसाच्या बोळ्याने केसांच्या मुळाशी लावून मसाज करा. आठवड्याभरात याचा परिणाम दिसून येईल.

कोरफड

कोरफड बहुगुणी आहे. केसांच्या, त्वचेच्या सौंदर्यासाठी कोरफड अतिशय उत्तम ठरते. कोरफडीचा वापर केस सुंदर, मजबूत आणि डॅंड्रफ फ्री होण्यासाठी होतो. कोरफड जेलने केसांच्या मुळाशी मसाज करा. त्यानंतर १५ मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवा. असे नियमित केल्याने केसातील खाज दूर होईल.

अॅपल व्हिनेगर

डोक्यातील घाग साफ करण्यासाठी याचा खूप वर्षांपासून उपयोग होत आहे. पाऊण कप पाण्यात पाव कप अॅपल व्हिनेगर घालून केसांना मालिश केल्यास खाजेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

लिंबू व मध

लिंबात अॅँटी बॅक्टेरिअल, अॅंटी फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे लिंबाच्या रसात मध मिसळून केसांच्या मुळांना मसाज करा आणि १५ मिनिटांनी केस धुवा. कोंडा, खाजेच्या समस्येपासून सुटका होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT