Tips to make your feet and nails look more beautiful kolhapur news 
लाइफस्टाइल

पाय आणि नखे जास्त सुंदर दिसण्यासाठी टिप्स

धनाजी सुर्वे

कोल्हापूर : सुंदर दिसण्यासाठी तर प्रत्येक जण धडपडत असतोच परंतु, पाय आणि पायाची नखे सुंदर दिसण्यासाठी फारसे कोणी प्रयत्न करत नाहीत असे दिसते. ज्यांच्याकजडे आपण दूरर्लक्ष करतो ते पाय दिवसभर आपला भार सोसत असतात. आपण नेहील तिकडे जात असतात. पाणी, उन, घाम, चिखल, जखमा, धावपळीचे प्रेशर सगळे काही हेच पाय सोसत असतात. मग या पायांकडे आणि त्यांच्या नखांकडे थोडे लक्ष द्यायला काय हरकत आहे?. चला तर मग पाय आणि पायांची नखे सुंदर दिसण्यासाठी काय करावे लागते.  

पायांना ठेवा नेहमी कोरडे

आंगोळ केल्यानंतर आपण सर्व शशीर पुसतो परंतु, पायाचे तळवे पुसत नाही. परंतु, पायाचे तळवे कोरडे नाही ठेवले तर फंगल इनफेक्शन होऊ शकते. टाचा उलतेत आणि त्वचा गळून पडू लागते. याशिवाय पायातून वास येण्यास सुरूवात होते.

मग काय कराल?

हलक्या आणि हवेशील चपला वापरा. ज्या नैसर्गिक वस्तुंपासून बनविल्या आहेत.  
ज्या-ज्या वेळी पाय ओले होतील त्या-त्या वेळी ते पूर्ण कोरडे करा. 

नखे कापताना होणाऱ्या चुकांमुळे वाढतात इमग्रोन नखे
नखे कापताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. नखे ही एकसारखीच कापावीत.

काय कराल?

नखांना गोल कापण्याएवजी सरळ कापा. तिरखे नख कापू नका. त्यामुळे इनग्रोन नखे वाढतात. नखे खूप छोटी कापू नका. कारण त्यामुळे इन्फेक्शन किंवा इनग्रोन नखे वाढू शकतात.

पायांच्या नखांना हेल्दी ठेवण्यासाठी घरगुती उपाय

कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून या पाण्यात पंधरा ते वीस मिनिटे पाये ठेवून बसा. 
डेंटल फ्लाॅसच्या मदतीने आपल्या नखांचे कोपरे कट करा आणि इनफेक्शनपासून वाचा. पायाल एखादी जखम झाली तर ती मोकळी सोडू नाका. त्यावर पट्टी बांधा. कारण जखमेत माती जाण्याची शक्यता असते. 

पायांना नेहमी माॅश्चराईज करा

पाय सुंदर दिसण्यासाठी त्याला सतत माॅश्चराईज करा. पायावर दिवसभरात अनेकवेळा पाणी पडू शकते, धूळ-माती पडू शकते. यावर माॅश्चराईज हा खूप चांगला पर्याय आहे. 
परंतु, पायांच्या बोटांमध्ये माॅश्चराईज लावू नका. 

पायांना मसाज महत्वाचा आहे

पायांच्या आरोग्यासाठी मसाज करणे खूप महत्वाचे असते. कोणतीही गोल वस्तू किंवा टेनिस बाॅलने मसाज करा. यामुळे पायांचे दुखणे पण कमी होते आणि पायांच्या रत्काचे सर्क्युलेशन चांगले राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi Mumbai Tour: सचिन तेंडुलकरसोबत भेट ते प्रदर्शनीय सामना... लिओनेल मेस्सीच्या मुंबई दौऱ्याचे अपडेट्स एका क्लिकवर

Tips For JEE Main Preparation: 12वी बोर्ड परीक्षेसोबत JEE Main ची तयारी कशी करावी? जाणून घ्या एक्सपर्टकडून

Latest Marathi News Live Update: १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात

Viral Video: खरा तो एकची धर्म ! महिलेने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सकाळी केलं असं काही... नेटकऱ्यांकडून होतेय प्रशंसा

IPL 2026 Auction पूर्वी मोठा 'खेला'! जो ऑलराऊंडर सर्वात महागडा ठरू शकतो, त्याची फक्त फलंदाज म्हणून नोंदणी; कुणी केला गेम?

SCROLL FOR NEXT