Pineapple Face Packs esakal
लाइफस्टाइल

Pineapple Face Packs : हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी अननसाची घ्या मदत, बनवा ‘हे’ फेसपॅक्स

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि रूक्ष होते.

Monika Lonkar –Kumbhar

Pineapple Face Packs : हिवाळा सुरू झाला की, बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होतो. मात्र, आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवर ही याचा परिणाम दिसून येतो. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि रूक्ष दिसते. त्यामुळे, या दिवसांमध्ये कोरड्या त्वचेच्या समस्या अधिक प्रमाणात वाढतात.

मग, या समस्या दूर करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या क्रीम्स, मॉईश्चरायझर्स आणि लोशन्सची मदत घेतो. परंतु, यामुळे, तात्पुरता फरक पडतो. त्वचेला नरिश करण्यासाठी व्हिटॅमिन सी हे अतिशय फायदेशीर आहे.

अननसामध्ये व्हिटॅमीन सी आणि बीचे भरपूर प्रमाण आढळून येते. या व्हिटॅमीन्समुळे त्वचेला आणि पचनक्षमतेला भरपूर फायदे होतात. त्यामुळे, अननस आवडीने खाल्ले जाते. आज आपण कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचेला सॉफ्ट करण्यासाठी फायदेशीर असलेल्या अननसाचे फेसपॅक्स जाणून घेणार आहोत.

ग्रीन टी आणि अननस

ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम,पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचा समावेश आढळून येतो. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे. ग्रीन टी मुळे त्वचेतील मृत पेशी निघून जाण्यास मदत होते.

ग्रीन टी आणि अननसाचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी ग्रीन टी ची पावडर २ चमचे घ्या. आता या पावडरमध्ये अननसाचा पल्प मिसळा. हे दोन्ही घटक चांगले एकत्र करा. त्यानंतर, हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवून टाका.

या फेसपॅकचा उपाय केल्याने तुमची त्वचा तर उजळेल, यासोबतच कोरडी त्वचा नाहीशी होऊन सॉफ्ट त्वचा मिळण्यास मदत होईल. (Green tea and pineapple)

दूध आणि अननस

त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी सर्वात आधी तुमच्या त्वचेतील ओलावा टिकवून ठेणे हे फार महत्वाचे आणि गरजेचे आहे. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेला नरिशमेंटची अधिक गरज असते. हा फेस पॅक तयार करण्यासाठी २ चमचे अननसाचा पल्प घ्या. त्यामध्ये, १ चमचा मध आणि २ चमचे दूध मिसळा.

आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करा. तुमचा फेसपॅक तयार आहे. त्यानंतर, हा फेसपॅक चेहऱ्याला लावा. २०-२५ मिनिटांनी तुमचा चेहरा धुवून टाका. या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेवर ग्लो येईल आणि त्वचेच्या पेशी दुरूस्त होऊन कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास फायदा होईल. (Milk and pineapple)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT