Shravan Health Tips 
लाइफस्टाइल

Shravan Health Tips : हे ५ तेल वापरा आणि कोलेस्ट्रॉलवर कंट्रोल मिळवा

श्रावणात वाढणाऱ्या तेलाच्या वापरामुळे कोलेस्ट्रॉलची चिंता सतावत असेल तर आता रिलॅक्स व्हा आणि तेलातील हे बदल करून बघा.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या बहुतांश पदार्थांसाठी तेलाचा वापर केला जातो. त्यातही श्रावण महिन्यातील उपवास, सणवार यामुळे तळणाचे प्रमाणही वाढलेले असते. याशिवाय सध्याच्या आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीपण बदलल्या आहेत. घरी बनवायला वेळ नसला की, बाहेर जाऊन किंवा बाहेरचे आणून खायचे अशा सवयी रुढ होत आहेत. तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.

रोजच्या स्वयंपाकात आपण खाद्यतेल म्हणजे कुकींग ऑइलचा वापर करतो. हे खाद्यतेल वेगवेगळ्या प्रकारचे असते. ही सर्वच तेलं आरोग्यासाठी चांगली असतात असे नाही. त्यातील काही प्रकारच्या तेलांच्या दीर्घकालीन वापरामुळे आपल्याला हाय ब्लडप्रेशर, हार्ट ॲटॅक, कोरोनरी आर्टरी डिसिज, ट्रिपल व्हेसल डिसिज आणि डायबेटिस यासोरखे आजार होण्याचा धोका असतो. तेलकट अन्न खेल्ल्याने आपल्या रक्तातील लो डेन्सिटी लिपोप्रोटीनची लेव्हल हाय डेन्सिटी लिपोप्रोटीनपेक्षा जास्त होते आणि ते शरीरासाठी धोकादायक असते.

जाहिरातातून लो फॅट आणि हेल्दी असल्याचा दावा करणारी अनेक तेलं बाजारात मिळतात. पण ही तेलं शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलच प्रमाण वाढवतात. या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट आढळत आणि ते आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी अनसॅच्युरेटेड फॅट हा योग्य पर्याय आहे. या तेलांच्या सेवनाने शरीरातील लो डेन्सिटी लिपोप्रोटीनचं प्रमाण कमी करता येते.

काही तज्ज्ञांच्या मते ऑलिव्ह ऑइल, कॉर्न ऑइल, सनफ्लावर ऑइल, पांढऱ्या मोहरीचे तेल आणि नट्स ऑइल शरीरासाठी उत्तम आहेत.

कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे इतर पर्याय

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जास्तीतजास्त फायबरयुक्त पदार्थ खा, जंक आणि फास्ट फूड खाणे टाळा, दररोज व्यायाम करा, बीटा ग्लूकन पदार्थ खा आणि दारूचे व्यसन सोडा. या पाच सवयींमध्ये बदल करून तुम्ही तुमच्या शरीरातले कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात. तसेच तुम्हाला तळलेले तेलकट पदार्थ खायची सवय बदला. त्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT