'कुल' दिसण्यासाठी कुर्त्यांना बनवा ट्रेंडी Sakal
लाइफस्टाइल

Fashion Tips : 'कुल' दिसण्यासाठी कुर्त्यांना बनवा ट्रेंडी

विविध रंग, प्रिंट आणि पॅटर्नमध्ये उपलब्ध असलेले कुर्ते ही फॉर्मल, कॅज्युअल आणि एथनिक वेअर म्हणूनही चालू शकतात.

सकाळ वृत्तसेवा

- पृथा वीर

प्रत्येक ऋतूची आपली फॅशन स्टाइल असते. कुर्त्यांची फॅशन मात्र कुठल्याही ऋतूत ट्रेंडी असते. वेगवेगळ्या प्रकारानुसार कुर्ते निवडाल, तर कंटाळा येणार नाही. अनेक जणी कुर्त्यांना ‘कुर्ती’ही म्हणतात. कुर्ता म्हणा, की कुर्ती- ही फॅशन ‘टॉप’ आहे यात शंका नाही.

उत्तम फॅशन सेन्सचे उदाहरण आपण नुकतेच पाहले. जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नॅन्सी त्यागीने संपूर्ण जगाला थक्क केले. ग्रामीण भागातून आलेल्या नॅन्सीने या फेस्टिव्हलसाठी स्वत:चे ड्रेस स्वत: डिझाईन केले होते. प्रत्येकामध्ये फॅशन सेन्स असतो, फक्त त्यासाठी स्वतःला वेळ द्यावा लागतो. थोडी मेहनत घेतली, तर योग्य कुर्त्यांची निवड तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पाडते.

विविध रंग, प्रिंट आणि पॅटर्नमध्ये उपलब्ध असलेले कुर्ते ही फॉर्मल, कॅज्युअल आणि एथनिक वेअर म्हणूनही चालू शकतात. व्हायब्रंट प्रिंट्सपासून ते सौम्य रंगांपर्यंत ते कुठल्याही प्रकारांत छान दिसतात. जसे ‘स्ट्रेट-कट’ कुर्ते.

कुर्त्यांचा हा प्रकार सर्वांत लोकप्रिय शैली मानली जाते. गुडघ्यापर्यंत ते थोडे खाली अशा लांबीचा स्ट्रेट कुर्ता औपचारिक आणि अनौपचारिक अशा कुठल्याही कार्यक्रमात छान दिसतो. कॉटन, बनारसी, लखनवी, चिकन कुर्ती चुडीदार, पलाझो किंवा रुंद पायांच्या पँटवरही छान दिसतो. उन्हाळ्यातील सर्वोत्तम फॅब्रिक म्हणजे कॉटन. पांढरा, बेबी पिंक, गुलाबी, आकाशी, लिंबू कलर, पर्पल अशा सौम्य रंगांतील कॉटन कुर्ते खूप छान दिसतात.

अनारकली कुर्ते ही तर एथनिक शैली. प्रिंटेड अनारकली कुर्ता किंवा सुंदर बॉर्डर असलेला प्लेन अनारकली कुर्ता असे पर्याय यात आहेत. अनारकली कुर्त्यांना मागच्या गळ्याला डोरी दिली जाते. अलीकडे हा ट्रेंड खूपच लोकप्रिय आहे.

अनारकली पॅटर्न वेगवेगळ्या डार्क कलरमध्ये मिळतात. हे कुर्ते खूप छान दिसतात. अनारकली कुर्त्यांवर हँगिंगचे कानातले, झुमके खूप छान दिसतात. शिवाय क्लासी लुकसाठी छानशी पोनी किंवा अंबाडा उठून दिसतो.

डस्टी इंग्लिश कलरमधले कॉटन कुर्तेसुद्धा अजून एक पर्याय आहे. हँड एम्ब्रायडरीच्या कुर्त्यांचे सुंदर विणकाम आणि तितक्याच नाजूक स्टीच खूप उठून दिसतात. बाही व नेकवर केलेल्या कलमकारी कामामुळे कलमकारी बॉर्डरचे कुर्ते एकदम मस्त दिसतात. कलमकारी कुर्त्यांना काथा वर्कच्या मल्टीकलर्ड दुपट्ट्याचे पर्याय दिले जातात.

हे कॉम्बिनेशन खरच छान दिसते. कलमकारीसोबत मागच्या बाजूने डोर, गळ्यावर गोट व विदाउट कट वर्कचे लाईट कलर हॅँण्डलुम कुर्तेही मिळतात. हे स्ट्रेट पँट, पलाझो, जीन्ससोबतही मॅच करता येतात. भारतीय आणि पाश्चात्य फॅशन ट्रेंडचे एकत्रीकरण म्हणजे बोल्ड स्टाइल स्टेटमेंट होते. यामध्ये कुठला पँटर्न नसतो, तर वेगवेगळ्या स्टाईल एकत्र केल्या जातात.

धोती-शैलीतील बॉटमसोबत इंडो-वेस्टर्न कुर्ते, जॅकेटसह लेअरिंग, केप-स्लीव्ह कुर्ते इत्यादींचा समावेश आहे, तर एथनिक कुर्ता सेट विविध प्रकारे परिधान करता येतात. डिझायनर जॅकेट ते विविध प्रकारचे बॉटम वेअर, टॉप, कोट, स्कार्फ आणि अगदी पादत्राणांचे प्रयोग करूनही एथनिक कुर्ते वापरता येतात.

फिटिंग महत्त्वाचे

कधी कधी कुर्त्यांची निवड चांगली असते; पण फिटिंग योग्य नसली, की गडबड होते, असे फॅशनतज्ज्ञ म्हणतात. म्हणूनच कुर्त्यांची फिटिंग योग्य हवी. मोनोक्रोमॅटिक किंवा गडद रंग वापरा. यामुळे तुम्ही स्लीम वाटता. ए-लाइन कायम छान दिसतात. वेगवेगळ्या; पण चांगल्या दर्जाच्या फॅब्रिक्सची निवड करा.

नवे रंगांचे प्रयोग करून बघा. कुर्त्यांसोबत बॉटम महत्त्वाची. वॉडरोबमध्ये एखादी मोजडी, सँडल जरूर ठेवा. अशाच प्रकारे वेगवेगळ्या फॅब्रिकच्या ओढणीसुद्धा शोभून दिसतात. प्रत्येक कुर्त्यावर ओढणी लागतेच असे नाही, तरीही कधी कधी ओढणीसुद्धा फॅशनमध्ये भर घालते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT