egg fridging  google
लाइफस्टाइल

उशिराने गर्भधारणा करायची असल्यास egg fridging आवश्यक

मूल जन्माला घालण्याचा निर्णय उशिरा घ्यायचा असेल तर AMHची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

नमिता धुरी

मुंबई : करिअर, स्वत:चं घर, मैत्रीतून नवरा-बायकोचं नातं फुलवत नेण्याची इच्छा, इत्यादी कारणांमुळे आजकाल पाळणा लांबवण्याकडे कल दिसून येतो; मात्र अधिक प्रौढ वयात बाळाला जन्म द्यायचा म्हटल्यास बाळंतपणातील गुंतागुंत वाढू शकते. त्यामुळे इतर काही मार्ग अवलंबणे आवश्यक असते.

शुक्राणूंची संख्या

पुरूषामधील शुक्राणूची संख्या चांगली असेल तर प्रौढ वयातही ही संख्या चांगली राहण्याची शक्यता असते. त्यामुळे उशिराने प्रजनन करण्यासाठी पुरुषाच्या शुक्राणूंच्या संख्येची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

AMH level ची तपासणी

पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या प्रौढ वयातही चांगली राहात असली तरीही महिलांच्या गर्भाशयाची क्षमता मात्र वयानुसार कमी होत जाते. त्यामुळे महिलांकडे आई बनण्यासाठी कमी वेळ असतो. एखाद्या महिलेला कमी वयात लग्न करायचे नसेल किंवा मूल जन्माला घालण्याचा निर्णय उशिरा घ्यायचा असेल तर AMHची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

AMH तापसणी म्हणजे काय ?'

महिलेच्या गर्भाशयाची अंडी तयार करण्याची क्षमता किती आहे हे यातून समजते. या तपासणीतील निष्कर्षाच्या आधारे पुढील आणखी किती काळ बाळंतपणाचा निर्णय पुढे ढकलला जाऊ शकतो याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतला जाऊ शकतो.

egg fridging

एखाद्या महिलेची AMH level वयाच्या तुलनेत कमी असेल तर egg fridgingचा पर्याय निवडला जाऊ शकतो. वयाच्या ३२व्या वर्षी egg fridging केल्यास ३६व्या वर्षी गर्भधारणा करतानाही अंड्यांचे वय बत्तीसच राहाते. परिणामी, प्रौढ वयातही गर्भधारणा करणे सोपे होते. egg fridging केल्यानंतर चार-पाच वर्षांनीसुद्धा गर्भधारणा केली जाऊ शकते. fridge केलेली अंडी पुरुषाच्या शुक्राणूसोबत एकत्र करून त्यांपासून भ्रूण तयार केला जातो. हा भ्रूण महिलेच्या गर्भाशयात सोडला जातो.

बाळंतपण लांबवण्यासाठी अलीकडच्या काळात अनेक महिला या पर्यायाचा अवलंब करत आहेत. अभिनेत्री राखी सावंत हिनेही एका मुलाखतीत egg fridging करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Ganeshotsav: शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणेशोत्सव नाही; 22 वर्षांची परंपरा खंडीत होणार!

MLA Rohit Pawar : शिरसाटांचा तत्काळ राजीनामा घ्या; बेकायदा जमीन वितरणप्रकरणी रोहित पवार यांची मागणी

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

SCROLL FOR NEXT