Shraddha Kapoor sakal
लाइफस्टाइल

Shraddha Kapoor: उन्हाळ्यात मस्त आणि स्टायलिश दिसायचंय, श्रद्धा कपूरकडून घ्या फॅशन टिप्स

उन्हाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात.

Aishwarya Musale

उन्हाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात. उष्ण वारा, कडक ऊन आणि घाम… या सर्व गोष्टी लक्षात घेऊन फॅशनेबल लुक करणे कठीण होऊन बसते. तुम्हाला उन्हाळ्यात स्टायलिश आणि मस्त दिसायचे असेल तर सेलेब्सकडून टिप्स घेऊ शकता. सेलिब्रिटींमध्ये ब्युटी क्वीन श्रद्धा कपूर नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

श्रद्धा तिच्या क्यूटनेस, सौंदर्य आणि फॅशनने नेहमीच आकर्षक दिसते. म्हणूनच तिला ब्युटी क्वीन असेही संबोधले जाते. उन्हाळ्यात आरामात राहून स्टायलिश दिसायचे आहे का? चला तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे काही समर लूक्स दाखवू.

श्राद्धाप्रमाणे वेअर करा कॉटन आऊटफिट

मेकअप नसतानाही श्रद्धा कपूर खूपच आकर्षक दिसते. या लूकमध्ये अभिनेत्री घरात मस्ती करताना दिसत आहे. जर तुम्हाला उन्हाळ्यात आरामाची काळजी घ्यायची असेल तर ज्यांचे फॅब्रिक कॉटनचे असेल असे कपडे घाला.

घामामुळे चिडचिड होते आणि कॉटनचे कपडे ते सहज शोषून घेतात. साध्या लूकमध्येही श्रद्धा सुंदर दिसत आहे.

समर इव्हेंटसाठी आऊटफिट

जर तुम्ही उन्हाळ्यात लग्नाच्या पार्टीसारख्या कोणत्याही कार्यक्रमाचा भाग बनणार असाल, तर तुम्ही श्रद्धाच्या या लूकपासून प्रेरणा घेऊ शकता. पांढऱ्या लेहेंग्यात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. उन्हाळ्यात गडद रंगाऐवजी हलक्या रंगाचे कपडे घालावेत.

फिकट रंग कोणत्याही स्किन टोनवर सहज सूट होतो. या लूकमध्ये श्रद्धाने मेकअप केला आहे, पण उन्हाळ्यात हलका मेकअप केला पाहिजे.

श्रद्धा कपूरचा शॉर्ट ड्रेस लुक

उन्हाळ्यात चिल करायचं आहे पण कोणता ड्रेस घालायचा या संभ्रमात आहे, त्यामुळे श्रद्धा कपूरचा हा लूक पहा. अभिनेत्रीने निळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला आहे. ड्रेससोबत पांढऱ्या रंगाच्या स्नीकर्सचे कॉम्बिनेशन लुक अधिक आकर्षक बनवत आहे. उन्हाळ्यात कट स्लीव्ह ड्रेसची फॅशन फॉलो करून कम्फर्ट आणि स्टाइल दोन्हीची काळजी घेता येते.

उन्हाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी फक्त हलके कपडे घाला. बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा आणि तुम्ही सनग्लासेस घालण्यास विसरू नका. डोळ्यांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासोबतच ते स्टायलिश दिसण्यासही मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT