traffic police sakal
लाइफस्टाइल

फक्त 'अशा'च लोकांना Traffic Police अडवतात; तुम्ही नाही ना त्यातले?

Traffic Police काय बघून बाईक चालकांना थांबवतात? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

ट्रॅफिक पोलिस (Traffic Police) अनेकदा दुचाकी चालकांना थांबवतात आणि त्यांच्याकडून चालान कापतात. पण तुमच्यासोबत कधी असे घडले की बाकीचे लोक नियम मोडत असताना त्यांना थांबवण्याऐवजी वाहतूक पोलीसांना तुम्हाला थांबवलंय आणि तुमचे चलन कापले.

दरदिवशी कित्येक लोक नियम मोडत असतात. पण काही लोकांनाच ट्रॅफिक पोलिस थांबवीत असतात. तुम्हाला माहिती आहे का Traffic Police काय बघून बाईक चालकांना थांबवतात? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (traffic police stop only these bike driver)

नंबर प्लेटमध्ये छेडछाड

तुमच्या नंबर प्लेटवर कोणत्याही प्रकारची छेडछाड केली असेल तर ट्रफिक पोलिस सर्वात आधी तुम्हाला अडवेल.नंबर प्लेटच्या रंगाशी छेडछाड, नंबर प्लेटवर कोणत्याही प्रकारचे स्टिकर तर ट्रॅफिकमध्ये तुम्हाला अडवले जाते. नंबर प्लेट नीट दिसत नसेल तर पोलिस थांबवतात.

अल्पवयीन वाहनचालक

१८ वर्षाखालील मुल जर बाईक किंवा गाडी चालवत असेल तर ट्रफिक पोलिस त्यांना अडवतात. कारण अशा मुलांकडे वैध असे ड्रायव्हिंग लायसन्स नसते. १८ वर्षाखालील मुलांना गाडी चालवण्याची समज नसते. असे मुलं स्वत:हून आपला जीव धोक्यात घालत असतात. त्यामुळे ट्रफिक पोलिस त्यांना थांबवतात.

जुनी गाडी

जर तुमची गाडी जुनी असेल तर ट्रफिक पोलिस तुम्हाला अडवणार. अनेकदा जुन्या गाड्यांची पीयुसी निघत नाही तरी देखील लोक त्याला वापरतात. त्यामुळे अशा गाडीधारकांना ट्रफिक पोलिस थांबतात.

मॉडीफाय बाईक

अनेक लोकांना त्यांच्या बाईक मॉडीफाय करण्याची सवय असते. तरुणांमध्ये मॉडिफाय गाडी करण्याचा ट्रेंड चांगलाच गाजतोय पण तुम्हाल माहीत असेल की दुचाकी मॉडीफाय करणे हे वाहतून नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे अशा बाईककडे सर्वात आधी ट्रफीक पोलिसांचे लक्ष जाते.

हेल्मेट न घालणे

जर तुम्ही हेल्मेट घातलेले नसेल तर ट्रफिक पोलिस सर्वात आधी तुम्हाला पकडतील. आणि हे खुप सामान्य कारण आहे. अनेक ठिकाणी हेल्मेट घालणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे ट्र्फिक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT