Trending Video
Trending Video esakal
लाइफस्टाइल

''देवा! आता तरी अवतार घे''; ही विचित्र साडी पाहून तुम्हीही व्हाल आवाक

सकाळ वृत्तसेवा

एका मुलीचा असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही विचारात पडाल.

अनेकांना एखादा चित्रपट (Movies) किंवा सिरियल पाहताना काहीतरी खाण्याची तल्लफ नक्कीच असते, अशावेळी अनेकजण चिप्स खाण्यास जास्त प्राधान्य देतात. आपल्यापैकी बहुतेकांना बसल्या जागी टाइमपास काहीतरी खायला मिळते याचा आनंद जास्त वाटतो. बटाटा चिप्स खाल्ल्यानंतर अनेकदा आपण ती पॅकेट्स कचऱ्यात फेकून देतो, पण या मुलीने काहीतरी क्रिएटिव्ह विचार करून रॅपरमधून साडी बनवली आहे. इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केलेल्या क्लिपमधील व्हिडिओमध्ये (Video), ती मुलगी चिप्स पॅकेटची साडी नेसलेली दिसत आहे जी बटाट्याच्या चिप्सच्या रॅपरपासून बनलेली आहे.

जेव्हा मुलीने अशी आगळीवेगळी साडी नेसली

रील बनवणाऱ्या मुलीने प्लॅस्टिक रॅपरच्या साडीसोबत बॅंगल्स आणि सॅंडलही घातली आहे. ही व्हायरल क्लिप bebadass.in ने इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या व्हिडिओचे कॅप्शन लिहिले आहे, 'ब्लू लेज आणि साडीलव्हर्ससाठी.' ओरिजनल व्हिडिओ 'Mae.co.in' ने पोस्ट केला आहे जो स्लो फॅशन ब्रँड आहे.

चिप्स पॅकेटची साडी नेसल्यावर लोकांच्या आल्या अशा प्रतिक्रिया

काहींनी या चिप्स पॅकेट साडीच्या आयडियाचे स्वागत केले, तर काहींना ते अजिबात आवडले नाही. एका यूजरने लिहिले की, 'आम्हा सर्वांना स्नॅकसारखे दिसायचे आहे.' दुसरीकडे, दुसऱ्या युजरने गंमतीत लिहिले की, 'साडी असावी तर ही अशी नाहीतर नाही'. दुसर्‍याने अशी साडी नाकारली आणि कमेंटमध्ये लिहिले, 'साडी प्रेमी आणि एक कलाकार म्हणून, मला हे पाहण्याचा तिरस्कार वाटतो. आजकाल लोक कलेच्या नावाखाली वेगवेगळ्या युक्त्या करतात. हद्द तेव्हा झाली जेव्हा एका यूजरने लिहिले, 'अरे देवा! आता तरी अवतार घ्या, पृथ्वी संकटात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT