Glassware
Glassware esakal
लाइफस्टाइल

फुटलेली काच साफ करण्याचे सोपे ट्रिक्स

सकाळ वृत्तसेवा

काचेचे मोठे तुकडे साफ करणे खूप सोपे आहे, परंतु लहान आणि बारीक तुकडे हात आणि पायाला टोचण्याची भीती मनात राहते.

प्रत्येक घरात काचेची भांडी (Glassware) असतात जी कोणत्याही कारणाने कधीही फुटू शकतात. जर ही काच रंगीत असेल तर पारदर्शक काचेपेक्षा स्वच्छ करणे थोडे सोपे आहे, कारण ते सहज दिसतात, परंतु जर काच पारदर्शक असेल तर ती साफ करणे अधिक कठीण होते. काचेचे मोठे तुकडे साफ करणे खूप सोपे आहे, परंतु लहान आणि बारीक तुकडे हात आणि पायाला टोचण्याची भीती मनात राहते.

काचेचे छोटे आणि सहज न दिसणारे तुकडे तुमच्या मुलाला किंवा तुमच्या पाळीव प्राण्यालाही हानी पोहोचवू शकतात. चला तर मग या ट्रिक्सने तुम्ही फुटलेल्या काचेचे तुकडे अगदी सहज स्वच्छ करू शकता.

स्वत:ला सुरक्षित ठेवा:

काच फुटणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु यामुळे होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पहिल्यांदा, स्वतःचे संरक्षण करा जेणेकरून फुटलेली काच साफ करताना तुम्हाला या परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही. काच उचलताना हातमोजे आणि चप्पल घाला. त्यानंतरच काच उचला.

सुरवातीला मोठे तुकडे उचला:

जेव्हा काच फुटते तेव्हा अनेक छोटे-मोठे तुकडे पडतात. नेहमी मोठे तुकडे आधी उचला आणि डस्टपिन (Dustpin) किंवा कागदावर ठेवा. तरच लहान तुकडे उचला. यासाठी तुम्ही झाडू वापरा. झाडूने काच साफ केल्यानंतर झाडू धुवून घ्या.

व्हॅक्यूम क्लिनर वापरा:

काचेचे बारीक आणि सहज न दिसणारे तुकडे व्हॅक्यूम क्लिनरच्या (Vacuum cleaner) मदतीने साफ करता येतात, पण लक्षात ठेवा की फुटलेली काच साफ केल्यानंतर व्हॅक्यूम क्लिनर पूर्णपणे स्वच्छ करा.

ब्रेड क्रंब्सने स्वच्छ करा:

ब्रेड क्रंब्सच्या मदतीने काचेचे बारीक तुकडे साफ करता येतात. जिथे तुम्हाला काचेचे तुकडे असल्याची शंका येते तिथे तुम्ही ब्रेडचा तुकडा ठेवू शकता. असे केल्याने तेथे उपस्थित काचेचे तुकडे त्यात चिकटतील.

उकडलेले बटाटे:

तुटलेली काच साफ करण्यासाठी बटाटे (Potatoes) देखील एक अतिशय प्रभावी पर्याय असू शकतात. यासाठी तुम्हाला एक उकडलेला बटाटा घ्यावा लागेल. त्याचे मधून दोन भाग करा. ज्या ठिकाणी काच फुटली आहे त्या जागी ठेवून स्वच्छ करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zomato Payment: झोमॅटो पेमेंट होणार बंद; कंपनीने RBIला परत केला परवाना, काय आहे कारण?

Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज करणार दाखल

रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय सोडून राजकारणात, ५ वेळा अटक,  बिहारमध्ये भाजपचा सर्वात मोठा चेहरा कसे बनले सुशील मोदी?

IPL 2024 : नाद करा पण आमचा कुठं! RCBनं विजयाचा 'पंच' मारला तरी कसा? संघाच्या हुकमी एक्क्यानेच केलाय खुलासा

Video Viral: लालू प्रसाद यांच्या मुलाने आपल्याच कार्यकर्त्याला स्टेजवरुन ढकललं खाली; व्हिडिओ होतोय व्हायरल...

SCROLL FOR NEXT