Rose Lassi Recipe esakal
लाइफस्टाइल

Rose Lassi Recipe : घरच्या घरी बनवा रोझ लस्सी, कडक उन्हाळ्यात मिळेल थंडावा! सोपी आहे रेसिपी

Rose Lassi Recipe : उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनीच आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी थंड पदार्थ किंवा पेय पिणे गरजेचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Rose Lassi Recipe : उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कमालीची उष्णता आतापासूनच जाणवायला लागली आहे. त्यामुळे, या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनीच आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी थंड पदार्थ किंवा पेय पिणे गरजेचे आहे. मात्र, याचे सेवन मर्यादित प्रमाणात करायला हवे. अन्यथा याचा त्रास होऊ शकतो.

जर यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हाला काही टेस्टी आणि हेल्दी ट्राय करायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी रोझ लस्सी बनवू शकता. ही लस्सी बनवायला अतिशय सोपी आहे. शिवाय, या रोझ लस्सीमुळे तुम्हाला थंडावा ही मिळेल आणि शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात रोझ लस्सीची ही सोपी रेसिपी.

रोझ लस्सी बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • दही – ३ कप

  • गुलाब सिरप – अर्धा कप

  • साखर – २ चमचे

  • गुलाबाजाच्या पाकळ्या सजवण्यासाठी

रोझ लस्सी बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • रोझ लस्सी बनवण्यासाठी सर्वात आधी एक मोठे बाऊल घ्या. या बाऊलमध्ये ताजे दही घ्या.

  • त्यानंतर, हे दही चांगले मिसळून घ्या.

  • हे दही पूर्ण गुळगुळीत झाल्यानंतर त्यात साखर घालायला सुरूवात करा.

  • साखर घातल्यानंतर दही पुन्हा एकदा किमान १० ते १५ मिनिटे चांगले मिसळून घ्या.

  • आता या मिश्रणात बर्फाचे तुकडे आणि थोडं थंड पाणी मिसळा.

  • जर तुम्हाला घट्ट लस्सी आवडत असेल तर, त्यात पाणी मिसळू नका. आता या मिश्रणात गुलाबाचे सिरप घाला, त्यानंतर लस्सीचा रंग गुलाबी होईपर्यंत ती चमच्याच्या मदतीने मिसळत रहा.

  • आता तुमची रोझ लस्सी तयार आहे. ही लस्सी ग्लासामध्ये ओता.

  • त्यानंतर, गुलाबाच्या पाकळ्यांनी सजावट करा.

  • तुमची थंडगार रोझ लस्सी आता सर्व्ह करायला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT