वेटलाॅससाठी प्रोटिनयुक्त चपाती Esakal
लाइफस्टाइल

Weight Loss साठी प्रोटीनयुक्त चपाती, मेणासारखी विरघळेल चरबी

वजन कमी करण्यासाठी डाएट करत असताना साधारण अनेकजण ताटातील भात आणि चपाती कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र ताटात चपाती Chapati नसेल तर जेवण Mealपूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. शिवाय सारखी भूक लागू शकते

Kirti Wadkar

वाढतं वजन ही अलिकडे एक मोठी समस्या बनली आहे. बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि ताण अशा अनेक कारणांमुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. वजन नियंत्रणात आणण्यासाठी Weight Control योग्य आहार आणि व्यायाम Expercise गरजेचेआहेत. अनेकजण वजन कमी कऱण्यासाठी विविध डाएट फॉलो करतात. Try These Chapaties to control your weight Marathi Fitness Tips

वजन कमी करण्यासाठी डाएट करत असताना साधारण अनेकजण ताटातील भात आणि चपाती कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र ताटात चपाती Chapati नसेल तर जेवण Mealपूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. शिवाय सारखी भूक लागू शकते.

गव्हाच्या चपातीमध्ये Wheat Chapati मोठ्या प्रमाणात कॅलरी आणि कार्ब्स असल्याने जास्त चपाती खाल्ल्याने वडन वाढू शकतं. मात्र जर तुम्हाला पोटभर जेवायचंय आणि वजनही कमी करायचं आहे. तर तुम्ही गव्हाच्या चपातीएवजी काही पर्यायी धान्यांच्या Grains चपातीचा आहारात समावेश करू शकता. 

वजन कमी करण्यासाठी गव्हाएवजी ओट्स, नाचणी किंवा ज्वारी सारखे धान्य फायदेशीर ठरू शकता. गव्हाच्या तुलनेत या धान्यांमध्ये कमी कॅलरी असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 

 ओट्स चपाती

वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी असलेला मात्र प्रोटीनयुक्त आहार गरजेचा आहे. यासाठीच ओट्स हा एक उत्तम पर्याय आहे. एक कप ओट्समध्ये जवळपास २६ ग्रॅम प्रोटीन असतं. यामुळे स्नायूंना पुरेस पोषण मिळून ते बळकट होण्यास मदत होते. 

ओट्समध्ये प्रोटीनसोबतच मुबलक प्रमाणात फायबर आढळतं. जास्त फायबर असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. यामुळे चयापचय क्रिया जलद होते त्यामुळे तुमची चरबी जलद गतीने वितळण्यास मदत होते. 

अशी बनवा ओट्सची चपाती

ओट्सची चपाती बनवण्यासाठी तुम्हाला बाजारातून ओट्सचं वेगळं पीठ आणण्याची गरज नाही. यासाठी ओट्सपासून तुम्ही घरीच पीठ तयार करू शकता. 

- एक बाऊल ओट्सची मिक्सरच्या मदतीने चांगली पावडर तयार करा. हे पीठ चपातीसाठी वापरा.

- यानंतर एका पातेल्यात एक वाटी पाणी, अर्धा चमचा तूप आणि चवीनुसार मीठ टाका.

- पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक वाटी ओट्सचं पीठ टाका. चांगलं ढवळा आणि झाकण ठेवा.

- गॅस बंद करून हे पीठ १०-१५ मिनिटं झाकून ठेवा. 

- हे पीठ थोडं गार झाल्यानंतर चांगलं मळून घ्या. 

- त्यानंतर या पिठाच्या तुम्ही चपात्या बनवून दोन्ही बाजूने चांगल्या शेकून घ्या. 

ओट्सच्या दोन चपात्यांचा तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात समावेश करू शकता. हाय़ प्रोटीन आणि फायबर तसंच ग्लूटन फ्री असलेल्या या चपातीमुळे तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. आणि वजन  कमी होण्यास मदत होईल. 

हे देखिल वाचा-

राजगिरा चपाती

 भारतात साधारण उपवासासाठी राजगीराचं सेवन केलं जातं. मात्र हाच राजगिरा वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. राजगिरा चपातीमुळे तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास सोपा आणि जलद होवू शकतो. 

राजगिरा हा प्रोटीनचा एक मोठा स्त्रोत आहे. तसचं यात फायबरही मोठ्या प्रमाणात असून अतर अनेक पोषक तत्व आढळतात. शिवाय राजगिऱ्यामध्ये कॅलरीचं प्रमाण अत्यल्प असतं. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

राजगिरा चपाती कशी बनवाल

कोणत्याही सुपर मार्केटमध्ये किंवा किराणा दुकानात राजगिरा पीठ सहज उपलब्ध होतं. राजगिरा चपाती तयार करण्यासाठी २ वाटी राजगिरा पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकावं. त्यानंतर कोमट पाण्याने पिठ मळून घ्यावं. हे पीठ ५-१० मिनिटांसाठी झाकून ठेवावं. त्यानंतर पुन्हा पिठ हलक्या हाताने मळून याच्या चपात्या तयार करा. 

मंंद आचेवर या चपात्या चांगल्या शेका. आहारामध्ये राजगिरा चपाती समाविष्ट करण्याचे अनेक फायदे आहेत. ही चपाती पचण्यासाठी हलकी आहे. 

त्याचसोबत राजगिरा चपातीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस असल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. तसंच यातील विटामिन्समुळे चयापचय क्रिया जलद होण्यास मदत होते ज्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते. 

अशा प्रकारे तुम्ही आहारामध्ये गव्हाच्या चपातीएवजी ओट्स आणि राजगिरा चपातीचा समावेश करू शकता. यासोबतच ज्वारी आणि  नाचणीची भाकरी हा देखील वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''तुम्ही बंजारा समाजासारखे दिसत नसतानाही आरक्षण का खाल्लं?'', धनंजय मुंडेंना उद्देशून जरांगेंचं मोठं विधान

अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ; पोलिसाच्या पत्नीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, दिरानं रुग्णालयात नेलं, पण...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

SCROLL FOR NEXT