Nagpur News esakal
लाइफस्टाइल

Nagpur News : रेल्वे स्थानकावर हेडफोन्स लावणं जीवावर बेतलं, तुम्हीही ही चूक करता काय ?

मृत्यूमागील कारण ऐकून तुम्हाला रस्ते किंवा रेल्वे रूळ ओलांडताना हेडफोन्स घालावे की नाही असा प्रश्न पडेल

सकाळ ऑनलाईन टीम

Nagpur News : हेडफोन्स घालत रस्त्यावर बिनधास्त फिरणं हल्ली कॉमन झालंय. तरुणांसह वृद्ध लोकसुद्धा हातात फोन पडकत कानाला लावण्याचा कंटाळा येतो म्हणून ब्लूटूथ हेडफोन्सचा वापर करतात. मात्र ते किती जीवघेणं ठरू शकतं याची कल्पना तुम्हाला आहे काय? नागपूरमध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. हेडफोन्समुळे तरूणीने जीव गमावला. तिच्या मृत्यूमागील कारण ऐकून तुम्हाला रस्ते किंवा रेल्वे रूळ ओलांडताना हेडफोन्स घालावे की नाही असा प्रश्न पडेल.

नागपूरमध्ये घडली धक्कादायक घटना

कानात हेडफोन (Headphones) लावून बोलण्यात भान हरपलेल्या विद्यार्थिनीचा रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना नागपुरात बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. आरती मदन गुरव (वय 19 वर्षे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

नागरिकांनी रेल्वे येत असल्याचे मोठमोठ्याने आरडाओरड करुन तरुणीला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र हेडफोन लावून असल्याने तिला आवाज ऐकूच आला नाही आणि क्षणार्धात रेल्वेखाली चिरडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेडफोन्स लावत रस्ता किंवा रेल्वे रूळ ओलांडू नका

हल्ली तरुण तरुणी सतत कानात हेडफोन्स लावून असतात. मात्र त्याचा आवाज तुम्हाला बाहेरच्या जगाशी संपूर्णपणे अज्ञात ठेवतो. तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे वेगवेगळे आवाज ऐकू सुद्धा येत नाहीत. तेव्हा रस्ता ओलांडता किवा रेल्वे रूळ ओलांडताना हेडफोन्स लावणे टाळले पाहिजे. किंवा तेवढ्या वेळेपुरती ते तात्पुरती बंद ठेवायला हवेत.

हेडफोन्सचा आवाज नियंत्रणात असावा

हेडफोन्स लावताना चुकूनही ड्राइव्ह करू नये. तसेच इतरवेळीसुद्धा हेडफोन्सवर गाणी किंवा कॉलवर बोलत असताना त्याचा आवाज एवढा असावा की तुम्हाला बाहेरचंसुद्धा ऐकू यायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात 1500 कोटींचा भ्रष्टाचार? पती मेल्याचे दाखवून 3 महिलांनी लाटले 6 लाख रुपये, एकाने पत्नी मेल्याचे दिले बनावट प्रमाणपत्र

Guru Purnima 2025: आज गुरुपौर्णिमा, जाणून घ्या पुजा करण्याची विधी अन् महत्व

Marathwada Rain: रिमझिम रिमझिम पावसाची; मराठवाड्यावरील रुसवा कायम, जोरदार सरींची प्रतीक्षाच

आजचे राशिभविष्य - 10 जुलै 2025

मोठी बातमी! वन विभागाच्या 5 एकरात अतिक्रमण; बोरामणी विमानतळाला खोडा घालणारा वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा धार्मिक अतिक्रमणाकडे कानाडोळा, वनमंत्री म्हणाले...

SCROLL FOR NEXT