Valentine special heart shape pizza esakal
लाइफस्टाइल

Valentine Week : व्हॅलेंटाईन स्पेशल पिझ्झा, पिझ्झा बघूनच जोडीदार म्हणेल ‘Dear, I Love You’

तुम्ही बनवलेला हा पिझ्झा जोडीदाराला नक्की आवडणार

Pooja Karande-Kadam

Valentine Week :

जसजसा व्हॅलेंटाइन डे जवळ येतो तसतसे लोक त्यांच्या जोडीदारासाठी काहीतरी स्पेशल करण्याचे प्लॅनिंग करू लागतात. आपल्या जोडीदाराला छानसं गिफ्ट देतात अन् तिला फिरायला घेऊन जातात. वर्षातला एक दिवस दोघांसाठीही वाढदिवसापेक्षाही स्पेशल असतो. त्यामुळे त्या दिवशी काहीतरी खास करण्याचे सगळेच ठरवतात.

काही लोक प्लॅन करताना अशा गोंधळात असतात की 'मी घेतलेले गिफ्ट जोडीदाराला आवडेल का?', तर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर गोंधळून जाऊ नका. एक गोष्ट करा ती म्हणजे तुमच्या जोडीदाराला तुमच्या हाताने बनवलेलं काहीतरी खाऊ घाला. तसं तर तुम्ही रोजच करत असाल. पण एका स्पेशल दिवशी स्पेशल पिझ्झा बनवला तर तो जोडीदाराला जास्त आवडेल.

अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना बाहेर जाण्यासाठी वेळ मिळत नाही, जर तुम्ही देखील त्यांच्यापैकी एक असाल तर आम्ही तुम्हाला अशा डिशबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी तयार करू शकता.

ही डिश बनवणे खूप सोपे आहे. आम्ही पिझ्झा बद्दल बोलत आहोत. तुमच्या जोडीदाराला खास वाटण्यासाठी तुम्ही स्वतःच्या हाताने पिझ्झा बनवू शकता आणि त्यांना खायला देऊ शकता. पिझ्झा बनवणे खूप सोपे आहे आणि प्रत्येकाला ते आवडते.

स्पेशल पिझ्झा बनवताना हे विसरू नका की व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी हा पिझ्झा तयार करत आहात. तर त्याचा आकार थोडा वेगळा करावा. ज्यामुळे तुम्ही हृदयच काढून जोडीदारासमोर ठेवत आहात असे वाटेल.  

हर्ट पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

पिझ्झा बेस-2 पिझ्झा सॉस-3 चमचे चीज-2 चमचे शिमला मिरची-1 चिरलेला टोमॅटो-1 चिरलेला ओरेगॅनो-1/2 चमचा चिली फ्लेक्स- 1/2 चमचा

स्पेशल आकाराचा पिझ्झा बनवण्याची कृती

आधी रेडीमेड पिझ्झा बेस घ्या. आता ते हृदयाच्या आकारात कापून घ्या. त्याचा आकार खूप लहान होणार नाही याची काळजी घ्या. यानंतर कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरचीचे समान तुकडे करा, आता सर्व प्रथम या बेसवर पिझ्झा सॉस घाला आणि चांगले पसरवा.

यानंतर त्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, स्वीट कॉर्न इत्यादी टाका. यासोबतच जोडीदाराच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या वाढवू किंवा कमी करू शकता.आता शेवटी पिझ्झाच्या वर किसलेले चीज टाका.

हा पिझ्झा ओव्हनमध्ये 20 मिनिटे शिजवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ओरेगॅनोनेही सजवू शकता. जर तुमच्या जोडीदाराला केचप आवडत असेल तर तो पिझ्झासोबत नक्कीच सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT