Online Dating App Fraud
Online Dating App Fraud Sakal
लाइफस्टाइल

Valentines Day: ऑनलाइन डेटिंग करताय?मग या चुका टाळा नाहीतर...

सकाळ डिजिटल टीम

अलीकडच्या काळात पाश्चिमात्य देशांच्या चालीरिती तसेच प्रथांचं भारतात मोठ्या प्रमाणात अनुकरण केलं जाते. जगभरातील इतर देशांप्रमाणे दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाला प्रेमाचा दिवस म्हटलं जातं. या दिवसाच्या निमित्ताने लोक त्यांच्या मनातील भावनांना वाट करून देतात. आवडत्या लोकांना भेटवस्तू देतात. परंतु व्हॅलेंटाइन डेच्या काळात ऑनलाईन डेटींग अ‍ॅपवर (Online Dating App) तुमची फसवणूकदेखील होऊ शकते. आज आपण अशाच काही गोष्टी बोलणार आहोत, ज्यातून तुमची फसवणूक केली जाते.

ऑनलाइन डेटिंगच्या नावाखाली होतात घोटाळे (Scams Behind Dating Apps)-

ऑनलाइन डेटिंगची संस्कृती भारतात खूप लोकप्रिय आहे. बरेच तरुण लोक आहेत प्रेमाच्या शोधासाठी ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्स आणि सोशल मीडियाचा वापर करतात. आता तुम्ही म्हणाल की या प्लॅटफॉर्मवर घोटाळे कसे केले जाऊ शकतात? या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एखादी व्यक्ती तुमच्याशी खूप प्रेमाने बोलते. तुमचा विश्वास संपादन करते.

तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे (Bank Account Should be empty)-

या काळात चोर समोरच्या व्यक्तीला भेटण्यासाठी टाळाटाळ करेल, यावरुनच ती व्यक्ती योग्य नाही, हे समजून जा. हे चोर तुम्हाला चुकीचे आर्थिक निर्णय घेण्यास भाग पाडतात, जसे की एखाद्या आकर्षक योजनेसाठी अर्ज करण्यास सांगणे, खोट्या समस्येचे कारण देऊन पैसे मागणे इ. मग अचानक एखाद्या दिवशी तुमच्याशी असलेला संपर्क ते पूर्णपणे तोडून टाकतात. कारण तुमचं खातं आता रिकामं झालं आहे आणि चोर ते रिकाम करून पसार झाले आहेत.

या चुका टाळा (Avoid these Mistakes)-

ऑनलाइन डेटिंगमधील मॅसेजशिवाय इतर अनेक मार्गांनी तुम्हाला अडकवले जाऊ शकते. यापैकी, वायर ट्रान्सफर कंपनीद्वारे रोख रक्कम हस्तांतरित करणे, गिफ्टकार्ड पाठवणे आणि रिलोडेबल डेबिट कार्डचा वापर हे सर्वात सामान्य आणि सुप्रसिद्ध मार्ग आहेत जे चोर डेटिंगच्या नावाखाली त्यांच्या भागीदारांची फसवणूक करतात.

स्वतःला असे सुरक्षित ठेवा (Keep Yourself Secure)-

आता अशा घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. जर तुम्ही एखाद्याला ऑनलाइन डेट करत असाल तर सर्वप्रथम तुमच्या जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना याबद्दल सांगा कारण ते तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात. तसेच सोशल मीडियावर तुमच्या जोडीदाराचे तपशील एकदा जरूर तपासा. शेवटी, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या फक्त ऑनलाइन संपर्कात असाल, तर त्याच्याकडून गिफ्ट कार्ड आणि ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार द्या.

तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे प्रोफाइल देखील खाजगी असावेत असा प्रयत्न करा कारण चोर ते प्लॅटफॉर्म देखील माध्यम म्हणून वापरतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

Dinesh Karthik RCB vs CSK : धोनीच्या षटकार ठरला आरसीबीसाठी टर्निंग पॉईंट... दिनेश कार्तिक असं का म्हणाला?

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

SCROLL FOR NEXT