#WeMetOnTwitter SAKAL
लाइफस्टाइल

Valentines Day: ट्विटरवाली लव्हस्टोरी; एका ट्वीटने फिट झाल्या अनेक प्रेमकथा

#WeMetOnTwitter: ट्विटरच्या (Twitter) माध्यमातूनसुद्धा अनेक स्टोरी बहरल्या आहेत, हे वाचून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल!

सकाळ डिजिटल टीम

आज व्हॅलेन्टाईन्स डे (Valentine's Day)...प्रेमाचा दिवस...या दिवस म्हणजे जगाभरातील अनेक प्रेमींसाठी एकप्रकारे सणच असतो. साहजिकच प्रेमाचा सण साजराही तितकाच उत्साहात होणार...म्हणूनच जगभरातील प्रेमी त्याची चातकासारखी वाट पाहत असतात. प्रेम ही खूप खास भावना आहे, ते कधी, कुठे, कसं आणि कुणावर होईल हे सांगता येत नाही. त्यातही आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियात (Social Media) तर प्रेमानं सर्व प्रकारची बंधने तोडली आहेत. अनेक लोकांच्या आयुष्यात स्पेशल लोकांची एंट्री झाली ती या सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप तसेच इंस्टाच्या माध्यमातून अनेक लव्हस्टोरी (Love Story) बहरल्या. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्विटरच्या (Twitter) माध्यमातूनसुद्धा अनेक स्टोरी बहरल्या. वाचून आश्चर्य वाटलं ना? हो सध्या ट्विटरवरील #WeMetOnTwitter हा ट्रेंड (Trend) हा त्याचाच एक प्रकारे आरसा आहे.

ट्विटर हा एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर लोक आपलं मत व्यक्त करत असतात. पण हे मत कधी राजकीय, असतं तर कधी सामाजिक...पण मत मांडता काही लोक कधी मित्र बनले आणि कधी त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. हे त्यांचे त्यांनाच कळलं नाही. आणि त्यांच्यासाठी ट्विटर हे मन सांधणारा दुवा ठरलं.

सध्या भारतात ट्विटरवर सुरु असणारा #WeMetOnTwitter या ट्रेंडवर लोक ट्विटरवर सुरु झालेल्या नात्यांबद्दल सांगत आहेत. #WeMetOnTwitter हा हॅशटॅग वापरून आपण ट्विटरवर कसे भेटलो याच्या कथा ते सांगत आहे

Ropin नावाच्या एका वापरकर्त्याने सांगितले की, तीन वर्षापूर्वी आमची ट्वीटरवर ओळख झाली. त्यानंतर दीड वर्षापूर्वी माझ्या वाढदिवसादिवशी आम्ही पहिल्यांदा भेटलो. पुढच्या वर्षी लग्न करणार आहोत.

तर the great depression नावाच्या वापरकर्त्यांने दोन तरूणींचा किस करतानाचा फोटो शेअर केला आहे. भारतातही #WeMetOnTwitter ची चर्चा होत आहे. २०२० च्या तुलनेत गतवर्षी म्हणजेच 2021 मध्ये ३७० टक्के अधिक ट्विट्स आलेल्या दिसतात. एवढेच नाही तर यावर्षी (२०२२) मध्ये एका महिन्यात (जानेवारी-फेब्रुवारीत) या संवादात २८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही, यंदा प्रथमच पर्यवेक्षकांची सरमिसळ

Morning Breakfast Recipe: प्रथिनेयुक्त नाश्ता बनवायचा असेल तर मुगापासून बनवा हा खास पदार्थ, अगदी सोपी आहे रेसिपी

Shiva Shakti Temple: भारताची एकमेव जागा जिथे शिव आणि शक्ती एकत्र दर्शन देतात, कुठे आहे हे पवित्र स्थळ पहा

INDW vs SAW, 1st T20I: जेमिमाह रोड्रिग्सचं शानदार अर्धशतक, स्मृती मानधनाचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

Accident News:'अपघातात आर्टिकामधील तिघे ठार तर दोन जखमी'; धरणगाव-धुपेश्वर रोडवरील घटना, चालकाचे नियंत्रण सुटल अन्..

SCROLL FOR NEXT